विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 10 April 2020

मराठ्यांनी जिंकलेले पाकिस्तानातील किल्ले, अटकेपार अफगाणिस्तान पर्यंत धडक...🚩

१० एप्रिल १७५८...





🚩
मराठ्यांनी जिंकलेले पाकिस्तानातील किल्ले, अटकेपार अफगाणिस्तान पर्यंत धडक...
१७५८ च्या मोहिमेत मराठ्यांनी अटकेपार धडक मारत सध्याच्या पाकिस्तानमधला मोठा भूभाग वर्चस्वाखाली आणला, संपूर्ण बलुचिस्तान आणि अगदी अफगाणिस्तानच्या सीमेवर उभ्या असलेल्या जमरुदच्या किल्ल्यापर्यंत मराठ्यांनी धडक मारली सरहिंद मराठ्यांनी जिंकल्यावर रघुनाथराव पेशवे, मल्हारराव होळकर, मानाजी पायगुडे, खंडूजी कदम, नेकाजी भोसले, साबाजी शिंदे यांच्यासह मराठ्यांच्या फौजा अटक, डेरा गाझी, मुलतान, पेशावर येथे तुकड्या तुकड्यांनी चाल करून गेल्या....
मराठ्यांनी जिंकलेल्या किल्ल्यांपैकी प्रमुख किल्ले असे होते....,
१. शाही किंला (लाहोर,पाकिस्तान ) - लाहोरमध्ये पहिले पाऊल टाकणारे वीर होते मानाजी पायगुडे, तारीख होती १० एप्रिल १७५८..
२.रोहतास ( झेलम शहर,पाकिस्तान ) – किल्ल्याला १२ मोठे दरवाजे आहेत तर सुमारे ६८ बलदंड असे ६० फुट उंचीचे बुरुज आहेत. "इस किले कि ताकद का कोई अंदाजा नही लगा सकता" असे जहांगीर या किल्ल्याबद्दल म्हणालेला...
३. बाला हिस्सार ( पेशावर,पाकिस्तान ) – बाला हिस्सार हे अफगाणी नाव असून याचा अर्थ कललेला किल्ला असा काहीसा होतो. अहमदशाह अब्दाली चा मुलगा तैमुरशाह दुर्राणी याने किल्ल्याला हे नाव दिले.दुर्राणी साम्राज्याची हा किल्ला म्हणजे हिवाळी राजधानी होती...
४. कोह्ना किल्ला – मुलतान, पाकिस्तान - मुलतान च्या किल्ल्याला कोहना किल्ला असेही संबोधले जाते. हा किल्ला सुमारे १२०० वर्षे जुना आहे. किल्ल्याचा घेर सुमारे २ किमी असून याला ४६ बुरुज आहेत. किल्ल्याला ४ दरवाजे आहेत...
५. अटक – १७५८ च्या ऑगस्ट महिन्यात आताच्या पाकिस्तानात असलेला ‘अटक’ चा किल्ला मराठय़ांनी जिंकला. या विजयात पानिपतवीर मानाजी पायगुडे आघाडीवर होते...
६. जमरुद किल्ला - खैबरखिंडीच्या पायथ्याशी असलेल्या जमरुड या किल्ल्यावर मानाजी पायगुडे, साबाजी शिंदे, तुकोजी होळकर, केशवराव पानसे इत्यादींनी कबजा मिळविला...

चित्र : १.शाही किंला (लाहोर) २.रोहतास ३.बाला हिस्सार ४.कोह्ना किल्ला ५.अटक ६.जमरुद चा किल्ला...

No comments:

Post a Comment

छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली सर्वात मोठी लढाई

  छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली सर्वात मोठी लढाई संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूर मध्ये हल्ला करून अशी दहशत निर्माण केली की बुऱ्हाणपूरच्या मौ...