विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday 23 June 2020

॥ शिवरायांच्या पत्रांचे प्रकार ॥

॥ शिवरायांच्या पत्रांचे प्रकार ॥

शिवकाळामध्ये पत्रांत वेग-वेगळे प्रकार पडत असत. प्रत्येक ठराविक प्रकाराचे स्वत:चे आपले एक वेगळे महत्व व अधिकार होते. शिवरायांच्या पत्रांमध्येही आपल्याला वेग-वेगळे प्रकार आढळुन येतात. ते थोडक्यात आपन जानुन घेऊयात.

अजरख्तखाने :- अज हा फ़ार्सी शब्द आहे. अज म्हणजे पासून, कडून. र अख्त या फ़ार्सी शब्दाचे चीजवस्तू, भारी फ़र्निचर, कपडे असे अनेक अर्थ सध्या होतात. रख्तखाना हा शब्द आदिलशाही व निजामशाहीच्या फ़ार्सी व मराठी कागदपत्रांमध्ये कचेरी या अर्थाने येतो. अजरख्तकाने राजश्री सिवाजी राजे म्हणजे राजश्री शिवाजीराजांच्या कचेरीकडून.

इजतमाब :- इज्जत म्हणजे प्रतिष्ठा, मान आणि माअब म्हणजे निधान, एखादि गोष्ट ज्यात आहे अशी जागा (पद). इज्जतमाअब या अरबी शब्दाचा अर्थ होतो ज्याच्यात इज्जत आहे असा, इज्जतदार, पतिष्ठीत, माननीय व्यक्ती, इजतमाब हा इजतमाअबचा मराठी अपभ्रंश शब्द आहे.

कौलनामा :- कौल म्हणजे शब्द, वचन वा अभय वचन. नामा म्हणजे पत्र. कौलनामा म्हणजे अभयपत्र, आश्वासनपत्र. कौलनाम्यात इतरही प्रकार पडतात. रयतेला कराविषयी दिलेला कौल नामा व जे लोक पूर्वी कधीतरी शत्रूला मिळालेले आहेत किंवा त्यांच्याकडून काही चुक झालेली असेल व ते माफ़िमागुन परत राज्यात येन्याची विनंती करत असतील तर त्या व्यक्तीला तुला पुर्वीचे गुन्हे माफ़करून अभयदिले आहे. असे त्याला वाटावे व त्याच्या मनात शंकाराहूनये म्हणुन कौलदिला जातो. अशा कौलाला कौलनामा म्हणतात.

मसूरल हजरत, मसहूरल अनाम :- मसूरल म्हणजे राजमान्य व हजरत हा ही बहुमानाचा शब्द आहे.

सरंजामी तह :- सरंजाम हा फ़ार्शी शब्द आहे. त्याचा अर्थ व्यवस्थापना असा होतो. तह म्हणजे ठराव. सरंजामी तह म्हणजे व्यवस्थेविषयीचा ठराव. सरकारी अधिकार्यांणा अंमलबजावणीकरीता काढलेला हुकूम म्हणजेच सरंजामी तह.

शर्तनामा तह :- अटींचा ठराव. प्रत्येक अट सांगुन ती मान्यकेली असे यातील लेखनपध्दती असते.

जाबिता तह् :- अधिकार, कायदा, नियम, अंमल. जाबिता तह म्हणजेच एखाद्या व्यक्तीला विशेष अधिकार देऊन काही विशेष काम सोपने. त्या कामाचा ठराव.

महजर :- एखाद्या तंट्यासाठी त्या भागातील सरकारी अधिकार्यांना जमवून त्या तंट्याविषयी अनेक व्यक्तींच्या साक्षी घेऊन व कागदपत्रे पाहुन देण्यात आलेला निर्णय असतो. तो लिखित स्वरुपात करून वादी प्रतीवादींना देन्यात येतो. त्या निर्णयावरच तो तंटा मीटतो. यात यातंट्याचा निवाडा करतांना हाजीर असलेल्या मंडळींची नावे व त्यांचे पदही असतात.

स्वस्ति श्री राज्याभिषेक शक :- शिवाजी महाराजांनी ६ जुन १६७४ रोजी स्वत:चा राज्याभिषेक करून आपला एक स्वत:चा शक सुरुकेला. राज्याभिषेक झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी काही पत्रांमध्ये या शकाचा उपयोग केलाला आढळुन येतो. पण जुन १६७४ च्या सर्व पत्रांवर आढळत नाही. या शकातील “स्वस्ति श्री” हे शुभसूचक शब्द आहेत.

शिवरायांच्या पत्रांमध्ये अशे एकुण ९ प्रकार प्रामुख्याने आढळुन येतात.

------------
साभार नितीन समुद्रेवार.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...