विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday 23 June 2020

म्हसवडकर राजेमाने

म्हसवडकर राजेमाने
माने म्हटले की म्हसवड डोळ्यांसमोर येते . रतोजी माने हे आदिलशहाचे बडे सरदार होते आदिलशहाकडून रतोजीस दहा गावची वतनी होती कण्हेर दहिगाव अकलूज भाळवणी कासेगाव ब्रम्हापूरी सांगोला आटपाडी नाझरे वेळापूर मिर्झा जयसिंगाने विजापूरी स्वारी केली तेव्हा जी रतोजीने दरबाराची सेवा केली त्यामुळे 1666 साली वरील गावे रतोजीस आदिलशहाने दिली होती. परंडा वगैरे मोगली किल्ला आदिलशाहीत जिंकून दिला होता.
रतोजीस नागोजी पुञ नागोजी म्हटले कि त्यांचा पराक्रम तर समोर येतोच पण त्यांची गद्दारी ही मनाला खिळवून जाते. साबाजी निंबाळकर हे शिवरायांचे सावञ मेहूणे दहिगावस स्थायिक झाले . साबाजी हे मोगलांचे वतनदार झाले यांनी शहाजीराजे यांना सोडून मोगलशाही पत्कारली होती. साबाजीस रंभाजी व तुकाराम असे दोन पुञ यातील तुकाराम नाईक निंबाळकर यांचे पुञ अमृतराव निंबाळकर, जानोजी , पिराजी व राधाबाई असे कुटूंब यातील राधाबाई नागोजीस दिली गेली. अमृतराव हे नागोजीचे मेहूणे होतात. नागोजी हे ही आदिलशाहीत वडीलोपार्जीत वतनावर दरबारी चाकरी करत होते .
शिवछञपतींनंतर संभाजी महाराज यांचा अतिशय क्रुरपणे झालेल्या मृत्यूने मराठा सरदार खवळले होते आदिलशाही संपुष्टात येऊन नागोजी मोगलांकडे गेले होते . संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज गादिवर आले आणि मोगलांपासून बचावार्थ जिंजीस गेले पण जिंजीस ही वेढा पडला होता त्या वेढ्यातून काही मराठा सरदार स्वराज्यात आले त्यात नागोजी होते . हे सरदार जिंजीत आल्याने मराठे अजून उत्साहाने वेढा परतवून लावू लागले. 1691_1697 स्वराज्यात संपुर्ण सात वर्षांची चाकरी निष्ठेने केली होती .
स्वराज्यात दाखल झाल्यावर राजाराम महाराज यांनी सरदेशमुखीचे इनाम दिला त्याचा तपशील म्हसवड येथील बारा वाड्या दहिगाव अकलूज भाळवणी कासेगाव ब्रम्हापूरी सांगोला आटपाडी नाझरे वेळापूर कलेढोण महाराजांनी 1691 साली हे नागोजीस दिले होते . शिवाय सरदेशमुखीच्या तप्यासाठी मुलूख दिला त्याची यादि निमगाव भूम काटी भोसे टेंभूर्णी मार्डी पानगाव इटे वासी हवेली वांगी राजांजन पांगरी बारसी मांडवे उंदरगाव मोहोळ करकंब फूटगाव तेरखेड सावरगाव एवढा मोठा मान सन्मान छञपतींनी नागोजीस देऊ केला होता.
नागोजी माने यांनी चार पाच वर्षें अतिशय प्रामाणिकपणे स्वराज्य सेवा केली होता पण परकीय राज्यकर्त्यांची चाकरी मनातून उठवू शकले नव्हते 1696 सालांपासून नागोजीने बादशाही सरदारांना संधान साधून होते . मेव्हण्याच्या मृत्यूने पत्नी राधाबाईने ही भावाचा सुड उगवण्यासाठी पतीचे ( नागोजीचे ) कान फुकले असावे आणि बादशाही चाकरी स्वीकारण्यासाठी संताजी घोरपडेंच्या मृत्यूमुळे एक नामी संधी मिळाली होती.
धुर्त औरंगजेब स्वतःहाच्या मुलाबाळांना संशयास्पद घटनांवरून खून करतो त्याच्याकडे माफिची याचना देखील शुल्लक ठरते अशा या संताजींच्या खुनाची बातमी देणार्यास खुशखबरखान पदवी देऊन नागोजीस माफी देऊन त्याने दरबाच्या अटितूनही मुक्त केले होते.
विशेष पाहता टेंभूर्णी हे दळणवळणाच्या ऐतिहासिक दृष्टिकोनातून फार महत्वाचे ठिकाण होते . शिवकाळ ते शंभूकाळात ही स्वराज्याची सीमा भिमेपर्यंतच होती पण राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीत सोलापूर जिल्ह्यातील काही गावांची सरदेशमुखी नागोजीस दिल्याची नोंद सापडते. पुढे हाच मुलूख औरंगजेबाने त्या देऊ केला होता.
साभार बाळासाहेब पवार चिञ. 1) टेंभूर्णी गढीचे मुख्यप्रवेद्वार

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...