विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 16 July 2020

स्वशौर्यशील छत्रपती 🚩🚩

स्वशौर्यशील छत्रपती 🚩🚩

एकीकडे शाहिस्तेखानाचे स्वराज्यावर आलेले संकट आणि दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या वेढात असे दुहेरी संकट ओढ़ावले असताना शिवाजी महाराजांना या वेढ्यातून बाहेर पडणे आवश्यक होते. याच समयी सिद्दी जोहरशी तहाची बोलणी करून त्याला गाफील ठेवण्याचे राजकारण शिवछत्रपतींनी केले याशिवाय शिवछत्रपतींनी सिद्दी जोहर यास द्वंद्वयुद्धाचे देखील आव्हान दिले पण सिद्दी जोहरने भयभीत होऊन हे आव्हान स्वीकारले नाही, शेवटी १३ जुलै १६६० रोजी शिवछत्रपती पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुखरूप निसटले..

छत्रपती शिवाजी महाराजांचे " स्वशौर्य " तसेच राजकीय मुत्सद्दीपणा, नियोजनबद्धता, गुप्तहेर खात्याचे अचूक काम, प्रसंगावधानता, संघटन कौशल्य आणि धाडस या सर्व गुणांची पन्हाळगड वेढ्यातून सुटका या घटनेतून आपणास नक्कीच प्रचिती येते..

- राज जाधव

No comments:

Post a Comment

राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला 🚩 भाग 9

  राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला भाग 9 लखुजीराजे जाधवरावांची हत्या भातवडीच्या युद्धानंतर मलिक ...