बारामती शहरापासून 14 किलोमीटर अंतरावर पारवडी नावाचे एक गाव आहे.गावात नदीच्या काठावर असलेली एक सुंदर आणि सुस्थितित अशी गढी अद्यापही पहायला मिळते. साधारण एक एकर परिसरात असलेल्या चौकोनी आकाराच्या या
गढीच्या चारही टोकावर चार भक्कम बुरुज असून पुर्वेकडील दोन बुरूजांमध्ये गढीचे मुख्य प्रवेशव्दार आहे. दगडी बांधणीच्या या भक्कम तटा -बुरूजांच्या माथ्यावर सर्व बाजूने असणा-या वैशिष्ट्यपूर्ण जंग्या व त्यावरील आकर्षक चर्या सर्वप्रथम लक्ष वेधून घेतात.
मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस पहारेक-यांच्या दोन देवड्या आहेत. वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे या देवड्यांमधूनच गढीच्या तटावर जाण्यासाठी दोन्ही बाजूस दोन जिने बांधले गेले आहेत. गढीची सर्व तटबंदी शाबूत असल्याने सर्व बाजूने आपल्याला व्यवस्थित तटफेरी मारता येते.
गढीच्या आतील भागात वास्तूंच्या चौथ-यांचे काही अवशेष असून आजूबाजूच्या ठिकाणी बुजलेल्या विहीरी आढळून येतात तर तटाच्या आतील बाजूने असंख्य लहानमोठे कोनाडे आहेत.गढीला मुख्य प्रवेशव्दाराराबरोबरच उत्तर दिशेस एक लहान दरवाजा असून याव्यतिरिक्त नदीकडील बाजूस एक चोर दरवाजा आहे.संपूर्ण गढी पाहण्यास अर्धा तास पुरेसा होतो .
Source-अmit निंबाळकर
No comments:
Post a Comment