अहिल्याबाईंनी आपली मुलगी मुक्ताबाई यांचा आंतरजातीय विवाह ला
वला होता...अहिल्याबाईंचा विवाह खंडेराव होळकर यांच्याशी झाला होता. त्यांना मालोजीराव आणि मुक्ताबाई ही दोन अपत्ये झाली.
पती खंडेरावांच्या मृत्यूनंतर (१७५४) बारा वर्षांनी सासरे मल्हाराव होळकरांचा मृत्यू झाला. त्यानंतर एकाच वर्षांनी राज्यकारभार पाहणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा देखील मृत्यू त्यांना पाहावा लागला. मुलाच्या मृत्यूपश्च्यात अहिल्याबाई स्वतः राज्यकारभार पाहू लागल्या.
होळकरांच्या जहागिरी क्षेत्रात चोर आणि डाकुंनी हैदोस घातला होता. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अहिल्याबाईंनी घोषणा केली कि " जो कोणी या दरोडेखोर डाकूंचा बंदोबस्त करेल त्या शूर व्यक्तीला वतनदारी देऊन त्याचा विवाह राजकन्या मुक्ताबाईंसोबत लावला जाईल. यावेळी जातपात बघितली जाणार नाही."
अहिल्याबाईंच्या घोषणेला साद देत यशवंत फणसे या युवकाने सैन्य हाताशी धरून दरोडेखोरांचा बंदोबस्त केला. यशवंत फणसे आदिवासी समाजातले. होळकरांच्या सैन्यात सैनिक म्हणून काम करत. घोषणेप्रमाणे अहिल्याबाईंनी रूढी परंपरा मोडत आपल्या मुलीचा विवाह यशवंत फणसे यांच्यासोबत लावून दिला.
मुक्ताबाई आणि यशवंतराव फणसे.
आंतरजातीय विवाहांची प्रथा पुढील पिढीत देखील चालू राहिली. त्यांचे वंशज यशवंतराव होळकर (धनगर) यांचा विवाह कोल्हापूरच्या शाहू महाराजांची चुलत बहीण चंद्रप्रभा बाई घाटगे (मराठा) यांच्याशी झाला होता.
@महाराष्ट्राचे शिल्पकार तेजस्विनी अहिल्याबाई होळकर
No comments:
Post a Comment