विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 23 July 2020

#संताजी_जाधव(सरसेनापती धनाजी जाधव यांचे पुत्र ) #यांची_समाधी_व_वाडा _मांडवे_सातारा




#संताजी_जाधव(सरसेनापती धनाजी जाधव यांचे पुत्र ) #यांची_समाधी_व_वाडा _मांडवे_सातारा
संताजी जाधव यांची समाधी मांडवे या त्याच्या जन्मगावी आजही अस्तित्वात आहे. गावच्या पूर्वेस समाधी असून समाधीवर घुमट असून त्याची पडझड झाली आहे. चौथऱ्यावर शंकराची पिंड आहे सध्या समाधी भोवती वेलीचे जाळे निर्माण झाले आहे. मात्र खूप लोकांना समाधीबाबत माहिती नाही.येथे शंकराचे पडके मंदीर आहे असे येथील ग्रामस्थ समजतात. सरसेनापती धनसिंग उर्फ धनाजी जाधव यांचा मांडवे येथील वाडा आजही अस्तित्वात आहें
सातारा गझेटीअरमध्ये या समाधी व वाड़या बाबत थोडक्यातच माहिती आहे
शिवकालीन राज्यात अनेक धुरंधर योद्धे या जिल्यात होऊन गेले. अशीच एक जोडगोळी ती म्हणजे सरसेनापती धनसिंग उर्फ धनाजी जाधव व संताजी घोरपडे. होय. यांची छबीसुध्दा पाण्यात दिसता मोगलाचे घोडे पाणी पिण्यास दचकत असत. गनिमी काव्याने छ.शिवरायानंतर हिंदवी स्वराज्य राखण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली.
सरसेनापती धनाजी जाधव यांचे सुपुत्र सेनापती संताजी जाधवही शूरवीर होते. शिवरायानी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्य रक्षणाचे कार्य करणारे हे शुर शीलेदार आपल्या सातारा जिल्हयातील नागठाणे परिसरातील मांडवे गावचे आहेत.

No comments:

Post a Comment

मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी!

  मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी! कात्रड भुईकोट किल्ला /कात्रड गढी कात्रड राहुरी अहमदनगर. Katrad ...