महाराष्ट्रातील #इचलकरंजी ही प्रसिद्ध मॅंचेस्टर सिटी आहे त्याच खालोखाल सांगली जिल्ह्य़ातील #बुधगाव हे #वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्ध आहे
#पटवर्धन घराण्याचे मुळ पुरुष #हरभटजीबाबा_पटवर्धन यांच्या सहा मुलांपैकी एका मुलाची शाखा बुधगाव येथे आपल्या वाटणीचा हिस्सा घेऊन राहत होती या घराण्यातील #माधवराव_पटवर्धन यांनी बुधगावमध्ये वस्त्रोद्योग सुरू केला तेव्हापासून इथे वस्त्रोद्योग भरभराटीला आला आहे शिवाय बुधगावमध्ये पटवर्धन घराण्याचा ऐंतिहासिक #राजवाडा असून सध्या मोडकळीस आला आहे भले मोठे प्रवेशद्वार, नगारखाना, देवडी, बाजूला दगडी तटबंदी असून त्यात राहण्यासाठी खोल्या बनवल्या आहेत आतील इतर इमारती व मुख्य राजवाडा नष्ट झाला आहे बुधगाव शहरात सिध्दनाथ मंदिर, ऐंतिहासिक चिक्कूची बाग, बुधगाव ग्रामपंचायत (King George v memorial), दवाखाना, सार्वजनिक वाचनालय, इत्यादी ऐंतिहासिक वास्तू आहेत
©Zunjar babar
No comments:
Post a Comment