बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू यांचे विशाळगडावर अंत्यसंस्कार ॥◆
बाजी काका, फुलाजी काका, नरवीर शिवा काशीद यांच्या बलिदानामुळे राजे विशाळगडावर सुखरूप पोहोचले यात काही शंकाच नाही.
अखेर आज शिवरायांच्या उपस्थितीत बाजी व फुलाजी काका यांच्यावर अग्निसंस्कार करण्यात आले.
सिद्धी मसूदचे सैन्य अडविताना कामी आलेले मराठी मावळे, धारातीर्थी पडलेले
बंधू फुलाजी, जखमी झालेले स्वत:चे शरीर या कशाचेही भान बाजींना नव्हते.
महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले याचा इशारा देणार्या तोफांच्या आवाजाकडे त्यांचे कान होते.
तोफांचा आवाज ऐकेपर्यंत ते दोन्ही हातात तलवार घेऊन प्राणांची बाजी लावून
लढत होते. खिंडीमध्ये महादेवाचा महारुद्र अवतार प्रकटलेला होता. तोफांचे
आवाज ऐकल्यावर कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने त्यांनी प्राण सोडले.
(ही घटना दिनांक १३ जुलै, १६६० रोजी घडल्याची इतिहासात नोंद आहे.)
मराठी सैनिकांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमाने आणि बाजींसारख्या
स्वराज्यनिष्ठांच्या पवित्र रक्ताने घोडखिंड पावन झाली म्हणूनच तिचे नाव
पावनखिंड झाले.
बाजी - फुलाजी बंधूंवर विशाळगडावर, महाराजांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
बाजीप्रभू व फुलाजी यांची समाधी विशाळगडावर आहे, तसेच पन्हाळगडावर बाजीप्रभूंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे.
स्वराज्यनिर्मितीसाठी छत्रपती शिवाजी महाराज सुखरूप, सुरक्षित राहायला हवेत यासाठी स्वत: मृत्यूला सामोरे जायची तयारी असलेल्या बाजी आणि फुलाजी देशपांडेंसारख्या सरदारांमुळे स्वराज्याचा पाया रचला जात होता. परंतु ही हिर्यांसारखी अमूल्य माणसे सोडून गेलेली पाहताना महाराजांना काय वाटत असेल हे सांगणे कठीणच.
‘रणचंडीचे जणू पुजारी, पावनखिंडीचे गाजी।
विशालशैली दिसती दोघे, बाजी आणि फुलाजी।।
#धन्य_ते_बाजी
#धन्य_ते_फुलाजी
#धन्य_ते_शिवा_काशीद
- गड-किल्ले संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य
No comments:
Post a Comment