विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 16 July 2020

#नरवीर_बाजीप्रभू_देशपांडे.

#नरवीर_बाजीप्रभू_देशपांडे.... एैसा पराक्रमी योद्धा होणे नाही..🚩🚩🙏🙏
#हजार घाव झेलूनही खिंडीत"बाजी" बाकी आहे....
#जोवर येत नाहीत तोफांचे आवाज तोवर लढण्याचा हट्ट बाकी आहे।।🚩🚩


१३ जुलै १६६०.... आजच्या दिवशी महा पराक्रमाची आणि जणू महादेवाचा रुद्र अवतार दिसावा अशी घटना घडली....
६०० मावळ्यांना सोबत घेऊन महाराजांनी सिद्धीचा वेढा तोडण्यासाठी रात्रीचा पन्हाळगड सोडला. काळोखाची रात्र आणि सह्याद्रीचा तो धो धो कोसळणारा पाऊस याच्यांतून महाराजांना प्रवास करायचा होता. नुसता प्रवास करायचा नव्हता तर पुढे विशालगड जिंकायचा होता त्यासाठी महादरवाजा फोडण्यासाठी लागणारे हातोडे, लोखंडी गोळे, दोरखंड आणि इतर साहित्य उरावर वहायचे होते. घोड्यांचा टापांचा आणि किंकळण्याचा आवाज येऊ नये म्हणून सगळा प्रवास पायीच करायचा होता. महाराज पालखीतून प्रवास करणार होते त्यासाठी पालखीचे खांदेकरी सोबत होते. त्यांची सुद्धा टीम होती, अवजड होत असेल तर खांदेकरी लगेच बदली करायचे पण वाटेत क्षणभर पण थांबायचे नव्हते.
या प्रवासात सर्वात महत्वाचे होते ते वाटाडे.त्या भागातील स्थानिक लोक ज्यांना संपूर्ण भौगोलिक माहिती होती अशा लोकांची टीम त्यावेळी महाराजांनी पुढे पाठवलेली असावी असे या घटनेवर संशोधन करणाऱ्यांना वाटते. आणि त्यांनी आणलेल्या खबरी हाच पुढील वाटचालीची दिशा ठरवणारे होते. त्याचात पण वेगवेगळ्या खबरी आल्या तर याच्यातून अचूक निर्णय घेण्याची मोठी किमया करावी लागणार होती.
महाराजांच्या पुढे अजून एक मोठा अडथळा होता तो सह्याद्रीचा.... कारण अरुंद आणि चिंचोळ्या वाटा प्रवासाची गती कमी करत होत्या... त्या अंधुक रात्री कोणत्याही प्रकारचे उजेडाचे साहित्याशिवाय हा प्रवास पायीच चालू होता... याच्या मध्ये कितीतरी सैनिक त्या निसरट्या वाटेवरून घसरून जखमी झाले असेल तरी पण या प्रसंग सावधान ओळखून कोणताही सैनिक मागे थांबला नाही...
एवढे करूनही सिद्धी जौहर ला खबर लागली आणि त्याने मसूद ला महराजांच्या मागावर पाठवले.आता युद्ध अटळ होते , महाराजांनी चिंचोळी जागा असणारी घोडखिंड युद्धासाठी ठरवली आणि सोबत असलेल्या ६०० मधील ३०० मावळे सोबत घेऊन विशाळगडाच्या दिशेने निघाले.राहिलेल्या ३०० मावळ्यांनी बाजी प्रभु देशपांडे यांच्या नेतृत्वात आता महाराज विशाळगड जिंके पर्यंत घोडखिंड मध्ये मसूदला थोपवून ठेवायचे होते.
अखेर ती वेळ आली जेव्हा त्या घोड खिंडीत महासंग्राम सुरू झाला.रात्री भर पळून पळून दमलेल्या मावळ्यांनी १ ,२ नव्हे तर जवळ जवळ ६ तास ही खिंड लढवली आणि विशाळगड वरून तोफेचा आवाज येई पर्यंत या ३०० मावळ्यांनी दुष्मनाचे २००० सैनिक कापून काढले. बाजी प्रभू देशपांडे सोबत बांदल देशमुखांची एक संपूर्ण पिढी या संग्रामात धारातीर्थी पडली. दुसऱ्या दिवशी जखमी झालेला एक मावळा अर्ध शुद्धी मध्ये कसाबसा जीव वाचवून विशाळगडी पोहचला आणि बाजी प्रभू देशपांडे यांचा दिव्य पराक्रम महाराजांना सांगितला....
#इतिहासामध्ये या युद्घा च्या तोडीस दुसरे कोणतेही युद्ध झाले नाही....
#नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांना आणि धारातीर्थी पडलेल्या ३०० बांदल देशमुखांना मानाचा मुजरा 🚩🚩🙏🙏
- विवेक पवार

No comments:

Post a Comment

राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला 🚩 भाग 9

  राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला भाग 9 लखुजीराजे जाधवरावांची हत्या भातवडीच्या युद्धानंतर मलिक ...