विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 30 September 2020

#राजराजेंद्र_शितोळे_देशमुख_घराणे

 


#राजराजेंद्र_शितोळे_देशमुख_घराणे
शिंदे_घराण्याचे_जावई_लाडोजी_शितोळे
व_नातू_दुसरे_सिध्दोजीराव_लाडोजी_शितोळे
आदिलशाही काळात पुणे परगण्यात २९० गावे होती यातील २५५ गावांची देशमुखी शितोळे घराण्याकडे होती उरलेल्या ३५ गावांची देशमुखी पायगुडे घराणे यांना मिळाली होती या घराण्याचे मुळ पुरुष दसमोजी नाईक शितोळे हे बहामनी राज्यात नोकरी करत होते यांचा मुलगा अडमोजी नाईक शितोळे हा आदिलशाही दरबारात सरदार होता यांना आदिलशाहीतून "राजराजेंद्र" असा किताब मिळाला होता अफजलखान वधानंतर याचा मुलगा मालोजी नाईक शितोळे हा आपल्या सैन्यासह स्वराज्यासाठी झटत होता
यानंतरच्या अडमोजी शितोळे, मालोजी शितोळे, अडमोजी शितोळे, खंडोजी शितोळे यांनी स्वराज्याची इमानेइतबारे सेवा केली खंडोजी शितोळे यांचा मुलगा सिध्दोजीराव शितोळे हा मोठा शूर होता त्याची आणि अलिजाबहाद्दुर महादजी शिंदेंची घनिष्ट मैत्री होती महादजी शिंदेंच्या खांद्याला खांदा लावून सिध्दोजीराव शितोळे यांनी पराक्रम गाजवला होता
यांचा मुलगा लाडोजीराव शितोळे हा ही मोठा पराक्रमी होता त्याने महादजी शिंदेंच्या आदेशावरून दिल्लीवर स्वारी करून बंडखोर वजीराचा पराभव केला बादशहाने त्याला दिल्लीचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून नेमले होते अशा पराक्रमी वीर लाडोजीराव शितोळे यांना महादजी शिंदेंनी आपली मुलगी बाळाबाई यांना देऊन बरीच जहागीरी बक्षिस म्हणून दिली शिवाय दरबारात प्रथम दर्जाचे सरदार म्हणून मान दिला
शितोळे घराण्याचा मध्यप्रदेश राज्यातील पोहरी येथे भला मोठा राजवाडा होता तिथच त्यांचे कायमचे वास्तव्य झाले या लाडोजीराव शितोळे यांचा मुलगा व बाळाबाईसाहेब शिंदे यांचा मुलगा दुसरा सिध्दोजीराव शितोळे यांना दिल्ली दरबारातून "उमात-उल-मुल्क" असा किताब दिला शिवाय त्यांचे आजोबा अलिजाबहाद्दुर महादजी शिंदेंच्या उपस्थित दरबार भरवून मानाची वस्त्रे, जरीपटका, कंठा, शिरपेच, जरीदार पालखी, शिक्का, कट्यार व पानिपत येथील १०६ गावची जहागीरी बहाल केली 🙏🙏🙏🙏🙏🙏
संदर्भ_ पुणे प्रांताचे राजा देशमुख शितोळे घ. इतिहास

No comments:

Post a Comment

सज्जनगडाचा "किल्लेदार जिजोजी काटकर"

  सातारा शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर उरमोडी उर्फ उर्वशी नदीच्या खोऱ्याच्या किनाऱ्यावर उभा असलेला “परळीचा किल्ला उर्फ सज्जनगड”... ●...