विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday 30 September 2020

|| शोर्यगाथा शिंदे सरकारांची||

 


|| शोर्यगाथा शिंदे सरकारांची||
मातृभूमिच्या रक्षनार्थ, स्वातंत्र्यासाठी मृत्युलाही हुलकावनी देत इंग्रजांच्या माना उडवत मराठवाड़्यातील (आसईतील) रक्तरंजित क्रांतीपर्वाची गाथा अवघ्या महाराष्ट्रात झळकावनार्या, जिगरबाज मराठ्यांच्या शौर्याचा विशेष लिहिलेला लेख _/\_
जालना जील्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील आसई या ठीकानी
23 सप्टेंबर 1803 साली घडलेला रणसंग्राम आणि त्यात हुतात्मा झालेल्या हजारो मराठ्यांची शौर्यगाथा ही आजही असंख्य मराठ्यांना माहीती
नाही.
वेलस्टीने मराठा फौजेचा भोकरदन आणि जाफ्राबाद दरम्यान तळ माघार घेन्यास सांगीतले परंतु शिंद्यांनी त्यास नकार दिला आणि तीथेच युद्धाला सुरुवात झाली, वेलस्टीने कर्नल स्टीव्हसन ला सोबत घेऊन सैन्याला आदेश दीला की मराठा दिसेल तीथे कापा, पण झुंजार मराठे आहेत ते दीसतात कुठे, 21 सप्टेंबर 1803 ला वेलस्टी आणि स्टीव्हसन हे जालना जवळील बदनापुर येथे असताना त्याना कळाले की मराठा फौजेने जाफ्राबाद जवळच तळ ठोकलाय, आणि त्याच दिवशी ईंग्रज सैन्य या दिशेने नीघालं आणि 23 सप्टेंबर ला नळनी या गावाला येऊन पोचलं. तीथुन एका उंच टेकडीवरुन पहानी केल्यावर त्यांना समजलं की अवघ्या सहा मैलावर केळना नदीच्या काठावर पलीकडे सैन्य आहे, तोफा पायदळ सर्व आहेत हे लक्षात आल्यावर वेलस्टीने आपल्या सैन्याचे तीन भाग केले व मराठ्यांच्या दीशेने कुच केली, मराठे बेसावध होते पण समशेरी ऊशाशी घेउन झोपनारे मराठे ते घाबरतात कसले??
हर हर महादेव च्या गर्जनांनी आसमंत ढवळुन निघाला, मराठ्यांनी वेलस्टीच्या सैन्यावर तोफांचा मारा सुरु केला, हजारो इंग्रज मारल्या गेले प्रचंड हाल त्या सैन्याचे झाले पण तीसरा भाग वेलस्टीने डाव्या बाजुने हल्ला करन्यास पाठवला, आणि त्यातच कर्नल स्टीव्हसन चं सैन्य ऐन वेळेवर उजव्या बाजुने आत आलं, चहु बाजुंनी मराठे वेढले गेले, ईंग्रजांच्या तोफमार्यांना मराठ्यांनी जशास तशे उत्तर देउन ईंग्रजांच्या 11 आँफीसर, 113 वीशेष अधिकारी आणि हजारो सैन्यासह त्यांचा तोफखाना उध्वस्त करुन याच मातीत गाडला....
परंतु दुर्दैव असे की ईंग्रजांच्या एकावर एक तुकड्या वाढत गेल्या आणि मराठे माञ तेवढेच, कीती वेळ टीकाव धरनार?? अखेर मराठे हरले,
दौलत शिंदे आणि रघोजी भोसले यांच्यासह असंख्य मराठा मावळ्यांनी स्वातंत्र्यासाठी मृत्युला कवटाळले...
छञपती शिवरायांनी उभ्या केलेल्या स्वराज्याच्या आणि मावळ्यांच्या अप्रतीम आणि ज्वलंत इतिहासाची परंपरा कायम ठेवत निजामांच्या मराठवाड़्यात ईंग्रजांना लोळवनार्या मराठ्यांच्या तेजोमय रक्तरंजित क्रांतीला...
विनम्र प्रणाम

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...