विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday 30 September 2020

लगड सरदार

 लगड सरदार:-

बऱ्याच ज्ञात अज्ञात मावळ्यांच्या कार्यात या स्वराज्याचा कळस गगनाला जाऊन भिडला., हर एक मावळ्याने मोठ्या निष्ठेने हे स्वराज्य वाढीस लागण्यासाठी कधी आपल्या घरादारावर तर कधी स्वतःच्या आयुष्यावरच तुळशीपत्रे ठेवली. त्यातले काही मावळे आज मोठ्या आदरार्थी भावनेने आपल्या मनात राज्य गाजवतात पण काही मावळ्यांना इतिहासाच्या पानाआडच रुतून पडावं लागले
अशाच एका अतिपरिचित मावळ्याचा आज उल्लेख आढळला ते मावळे म्हणजे "सरदार संभाजीराव लगड" वेगवेगळ्या गोष्टींसाठी ठरावीक माणसांचे मंडळ गट हेच शिवकालीन स्वच्छ प्रशासनाचे द्योतक होय.
शिवकालीन प्रशासनामध्ये १२ महाल १८ कारखाने आणि विविध विभाग होते. त्यातल्या दान किंवा सनद दानपत्र वाटपासंबंधातली कामे ज्यांच्याकडे होती त्यास. गोसावी म्हटले जात.
महाराज वेगवेगळ्या जातीधर्माच्या प्रार्थनास्थळासाठी स्वरज्याच्यापरीने दिवा बत्तीची, पुजाऱ्याची सोय केली जात असे. महाराजांच्या या दानपत्राची किंवा सनद वाटपाची कामे संभाजीराव लगड या सरदाराकडे होती.
अपरिचित_असे_काही


No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...