विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday 30 September 2020

बाजी मोहिते पाटील तळबीड


 बाजी मोहिते पाटील तळबीड :-
.

तळबीडचे मोहिते तस मातब्बर घराण मुळात तळबीडची कुसहि समर्थ शिलेदार जन्माला घालणारी कुस फत्ते पावन हेच ध्येय सहाजिकच माराठा लश्करात तळबीडकरानी भरल होत.....,
रतोजी मोहिते निजामशाहीतील असा बलदंड माणुस की ज्याच्यावर झेंडा फडकवायला सारया शाह्या तग धरुन होत्या मुर्तुजा निजामशाहिचा विरोधक त्याच्याच लोकांनी बंड केला रतोजी त्यांना आडवा आला आणि असा पराक्रम केला कि ते बंडखोर जीव वाचवुन पळाले..हा पराक्रम पाहुण निजाम खुश झाला आणि या मोहिते बहाद्दरास ''बाजी "हा किताब बहाल केला
रतोजीँचा मुलगा तुकोजी तेथील मुतालीक चव्हाण यांना अभय,देउन तळबीडकरांच्या इच्छेनुसार पाटिलकी मिळवली...त्यांना तीन आपत्य संभाजी धारोजी आणि तुकाबाई.
निजामशाही सोडुण नावारुपास आलेले शहाजीराजे यांच्यावर सरदार संबाजी अणंत याला धाडले गेले ..त्याने सालगण्या घाटात राजेँना कोंडले .त्या वक्ताला तिथे मोहिते बंधु मदतीला आले त्यांनी पराक्रम केला ..नंतर संभाजी -धारोजीच्या प्रस्तावावरुन तुकाबाईंना भोसले घराण्यात देण्यात आले इथुनच भोसले- मोहिते सोयरिक जमली
यावेळेपावतो तळबीडची पाटिलकी असलेले मोहिते -पाटिल संभाजी- धारोजीच्या पराक्रमामुळे प्रत्यक्ष शहाजीराजेंच्या मेहेनजरेमुळे आणि
मोहित्यांच रक्त शिलेदाराच म्हणूनतर अदिलशाहित धारोजीनी "शुर सेनानी " मानाच स्थान हासील केल....
चंद्र कलेकलेने वाढतो तसेच छत्रपतीँच्या समर्थान हिंदवी स्वराज्य उभे झाले प्रत्यक्ष शिवछत्रपतींच्या खांद्याला खांदा लावुन शिलेदारी करणारे "मोहिते "स्वराज्यात हिराप्रमाने चमकले .प्रत्यक्ष संभाजी मोहित्यांचे पुत्र हंसाजी मोहिते हे मराठी दौलतीचे जुमलेदार होते ते सरनोबत झाले व """"हंबीरराव हा किताब मिळवला ...
आणि मग काय दौलतीत सामिल झालेल्या गावात तळबीडचा दबदबा वाढला ..
तळबीडचे बाजी- मोहिते
रतोजी बाजीमोहिते
संभाजी बाजीमोहिते
धारोजी बाजीमोहिते
हंबीरराव बाजीमोहिते
तसेच महाराणी ताराराणी
तळबीडच्या मातीत सगळ्यांना हेवा वाटेल असा सेनानी जन्मला
...
Regards abhishek kumbhar

सरसेनापती हंबीरराव मोहीते -

● शिवशाहीच्या उदयापुर्वी अनेक कर्तबगार घराणी उदयास आली होती त्यामध्ये मोहिते, घाटगे, महाडिक, सुर्वे, जाधव, सावंत या विविध घराण्यांनी पराक्रमी पुरुषांनी मुस्लिम शाह्यामध्ये लष्करी सेवा करून नावलौकिक मिळवला होता.त्यांच्या भोसले घराण्याशी संबंध आला त्यावेळी नावलौकीकात आणखीनच भर पडली.काही घराण्यांनी छत्रपती घराण्यांशी नातेसंबंध निर्माण केला.त्यापैकी मोहिते घराणे जवळचे घराणे होते.या घराण्यात अनेक कर्तबगार पुरुष निर्माण झाले.याच घराण्यातील हंबीरराव मोहिते यांना शिवरायांनी अष्ठ्प्रधान मंडळामध्ये सरसेनापती म्हणुन स्थान दिले.खर्या अर्थाने हंबीरराव हे स्वराज्याचे पहिले सरसेनापती होते.हंबीररावांच्या अगोदर शिवरायांचे पराक्रमी सेनापती प्रतापराव गुजर व नेताजी पालकर यांचे स्वराज्यस्थापनेत मोठे योगदान आहे.परंतू त्यांच्याबाबतीत शोकांतिका झाली आणि साहजिकच हंबीरराव सरसेनापती झाले.
सरसेनापती हंबीररावांच्या गराण्याचा इतिहास पाहिला तर तो गौरवशाली आहे.हंबीररावांचे पणजोबा रतोजी मोहिते यांनी निजामशाहीत मोठा पराक्रम गाजविला होता.त्यांना निजामशाहीने “बाजी” हा किताब दिला होता.हे घराणे तळबीड या गावची पाटीलकी सांभाळत होते.तुकोजी मोहिते हे पराक्रमी पुरुष तळबीड येथे आला व तेथील पाटीलकी सांभाळत सेवा करू लागला या घराण्याने घाटगे आणि घोरपडे घराण्याशी सोयरीक जुळवून आणली.याच दरम्यान शहाजीराजे यांच्याशी या घराण्यातील संभाजी व धारोजी मोहिते यांचा संबंध येवून शहाजीराजांच्या लष्कारात सामील झाले व मोठे शौर्य गाजवले.संभाजी मोहिते व धारोजी मोहिते त्या काळातील प्रराक्रमी सेनानी होते.त्यांच्या शौर्याची गाथा अदिलशाही फ़र्मानामध्ये पहावयास मिळतात.यातील संभाजी मोहितेचा मुलगा म्हणजे हंबीरराव मोहिते हा मर्दमराठा शिवरायांच्या सानिध्यात आले.स्वराज्याच्
या स्थापनेवेळी संभाजी मोहिते हे शहाजी राजेंच्या लष्करात सहहवालदार होते.संभाजी मोहिते पुढे कर्नाटकला गेले मात्र आपली मुलगी सोयराबाई हिचा विवाह शिवरायांसोबत लावून दिला व छत्रपती घराण्यांशी पुन्हा नाते निर्माण केले.पुढे संभाजी मोहिते यांचा मुलगा हंबीरराव मोहिते यांनी आपली मुलगी ताराबाई हिचा शिवपुत्र राजाराम महाराजांशी विवाह लावून दिला.मोहिते घराणे हे छत्रपतीचे अगदी जवळचे घराणे आहे.याच घराण्यातील उदयास आलेला मर्द मराठा म्हणजेच हंबीरराव मोहिते. शिवरायांच्या राज्याभिषेकापुर्वी महापराक्रमी सेनापती प्रतापराव गुजर बहलोल खानाशी झालेल्या संघर्षात मारले गेले.त्यांच्या शोकांतिकेनंतर ते सेनापती पद रिकामे झाले व ते पद हंबीरराव मोहितेंना दिले आणि अष्टप्रधान मंडळातील सरसेनापती पद म्हणुन मान मिळाला.हंबीरराव हा प्रतापरावांच्या सैन्यात सेनानी होता.ज्यावेळी प्रतापराव पडल्याचे कळाले तेंव्हा हंबीररावांनी अदिलशाहीच्या सेनेवर जबरदस्त हल्ला केला.शत्रुला विजापुरपर्यंत पिटाळून लवण्यात हंबिररावांचे मोठे योगदान आहे.सरसेनापती हा केवळ पराक्रमीच असून चालत नाही.तर तो प्रसंगाचा जाणकार व ह्रुदयाठायी शहाणपण आणि सबुरी असावी लागते.हे सर्व गुण हंबीररावांकडे होते.छत्रपती शिवरायांनी त्याच्या पराक्रमाचा गौरव म्हणुनच अष्ठ्प्रधान मंडळात स्थान दिले.हंबीररावांचे मुळ नाव हंसाजी मोहिते होते.महाराजांनी हंसाजी चा “हंबीरराव” हा किताबाने सन्मान केला.सरनौबत दिली.राज्याभिषेकानंतर मोघली सुभेदार दिलेरखान व बहादूरखान यांच्या छावण्यावर हल्ला करण्याचा आदेश शिवरायांनी हंबीररावांना दिला.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...