मराठा साम्राज्याचे शिलेदार रतोजी राजेमाने यांचा वाडा
म्हसवड हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एक शहर आहे. म्हसवड शहर ही प्राचीन शहर आहे. म्हसवड हे मध्ये महाराष्ट्र भर प्रसिद्ध असणारे सिद्धनाथ मंदिर आहे. या मंदिराची वर्षाला माणगंगा नदी काठी मोठी यात्रा भरते.
मराठा साम्राज्याचे एक शिलेदार रतोजी राजेमाने यांचा या भागावर अंमल होता.या मराठा घराण्याचे रतोजीराव माने विजापूरच्य आदिलशाही दरबारातील एक बडे शूरवीर सरदार होते. त्यांचे पुत्र नागोजीराव माने हे सुद्धा तितकेच पराक्रमी शूरवीर होते. छत्रपती राजाराम राजेंना जिंजीच्या वेढ्यतुन सुटका करण्यास नागोजीराव यांनी मदत केली होती.
इतिहास अभ्यासताना मराठ्यांच्या शहाण्णव कुळातील माने हे राष्ट्रकूट राजवंशातील वंशज कूळ असावे असे वाटते. इ. सनाच्या ४ थ्या शतकाच्या मध्यात सांगली, सातारा, कोल्हापूर, बेळगाव आदी भागात मानपुरच्या राष्ट्रकूट राजवंशाचे शासन होते. मानाङ्क हा राष्ट्रकूट राजवंशाचा संस्थापक राजा आहे. त्याची राजधानी मानपूर ही त्याच्या नावाशी साधर्म्य सांगणारी अशीच आहे.
रतोजी राजमाने यांचा म्हसवड ऐतिहासिक वाडा सध्या नामशेष झाला असून वाड्याची कमान व बुरुज सध्या धन्याच्या पराक्रमाची साक्ष देत शेवटची घटिका मोजत आहेत.
फोटो - प्रणव साळुंखे
साभार - Ramkumar Shedge
No comments:
Post a Comment