मराठा स्वराज्य मग ते शिवकालातील असो किवा पेशवेकाळातील असो किवा होळकर काळातील असो त्या वीरांचा इतिहास .जे मराठा स्वराज्यासाठी लढले त्या मराठा वीरांचा इतिहास
विनोद जाधव एक संग्राहक
Tuesday, 10 November 2020
#मालोजीराजे_भोसले
#मालोजीराजे_भोसले
शिवरायांचे आजोबा आणि वेरूळचे सरदार मालोजीराजे भोसले
या भागात आपण मालोजीराजेंविषयीचा एक अपरिचित इतिहास जाणून घेऊयात.
आपल्यापैकी अनेकांनी कुणाच्या भाषणात किंवा आंतरजालावर किंवा कोणत्या पोवाड्यात मालोजीराजे यांचे सुपुत्र शहाजीराजांचा लग्नाविषयीची रंगपंचमीची दंतकथा नक्कीच ऐकली असेल.
ती असत्य दंतकथा काहीशी पुढीलप्रमाणे-
"शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी साधे शिपाई होते. रंगपंचमीच्या दरबारात त्यांचा मुलगा शहाजी व त्यावेळेचा निजामशाहीतील एक दिलदार सरदार लखुजीराव जाधव यांची मुलगी जिजाबाई हे खेळत असता जाधवराव "जोडा किती सुंदर दिसतो" असे म्हटल्यावर मालोजी स्वतःला जाधवांचे व्याही म्हणू लागले. जाधव रावांना ते पटले नाही. परंतु निजामशहाने जाधवरावांचे प्रस्थ कमी करण्यासाठी मालोजीराजांनी हाती धरून वाढविले व निजामशहाच्या मध्यस्थीने जिजाबाई मालोजी यांच्या मुलाला मिळाली. तरी अपमानाचे शल्य जाधवांच्या मनात राहिले व शहाजी व जाधवराव यांचे अखंड वैर सुरू राहिले."
खरेतर शहाजीराजे पाच वर्षांचे असताना मालोजीराजांनी मृत्यूने गाठले ही सत्य घटना लक्षात घेतली म्हणजे शहाजी व जिजाबाई यांच्या रंगपंचमीतील खेळाची व मालोजींच्या त्यांच्या विवाहाच्या घोषणेतून जाधव रावांशी निर्माण झालेल्या स्पर्धेची घटना खोटी ठरते.
वास्तविकता शहाजी महाराजांना पाचवे वर्ष लागले असता इंदापूरच्या संग्रामात मालोजीराजांचा मृत्यू झाला. पुढे शहाजी आणि शरीफजी यांचे पालन पोषण त्यांचा चुलता विठोजी आणि केले. मालोजी यांच्या जहागिरीचा वारसा निजामशहाने शहाजींलाच दिला आणि आपल्या पराक्रमाने हळूहळू वाढत शहाजी जेव्हा वैभवश्रीने तळपू लागले तेव्हा त्यांची योग्यता व कर्तृत्व पाहून जाधवराव यांनी आपली मुलगी जिजाबाई शहाजींना दिली हेच शहाजींचे पहिले लग्न होते. व ते जाधवरावांच्या पसंतीने झालेले आहे. त्यात कोणताही अस्वाभाविक प्रकार नाही.
शहाजी महाराजांचे जाधवरावांशी वैर हे खंडागळे हत्ती प्रकरणातून सूरू झाले हेच सत्य आहे.
जेधे शकावली आणि शिवभारतानुसार, शिवछत्रपतींचे पूर्वज हे केवळ सामान्य नोकर नसून पूर्वापार राज्य असून बहामनी राज्यांच्या सुरुवातीपासून स्वतंत्रपणे सत्तेत जोरदारपणे वावरत होते. मालोजी हे स्वतंत्र सरदार अथवा जहागीरदार असून निजामशहाच्या पदरी ते सामान्य नोकर मुळीच नव्हते.
ग्रँड डफ आणि इतिहासकार जदुनाथ सरकार यांना जेधे शकावली आणि शिवभारत यांची माहिती नसल्याने मालोजीराजांनी विषयी सामान्य नोकर असल्याचे असत्य त्यांनी लिहिले असावे.
©maratha_riyasat
#shivajimaharaj #maratha #marathi #history #shivajimaharajhistory
Subscribe to:
Post Comments (Atom)
! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!
! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...

-
११ माशी अक्करमाशी असा उल्लेख असा येतो. आपण प्राचीन क्षत्रियांचे वंशज आहों असें मराठे म्हणतात. प्रचारांतल्या त्यांच्या आडनांवा...
-
25 सप्टेंबर 1750 रोजी नानासाहेब पेशवे व राजाराम महाराज द्वितीय यांच्यात सांगोला करार झाला सांगोला करार :- छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थाप...
-
महत्वकांक्षी महाराणी बाकाबाई ( डोंगरक्वीन ) श्रीमंत महाराणी बाकाबाई भोसले (१७७४-१८५८) या दुसरे राजे रघुजी भोसले यांच्या चौथ्या आणि आवडत्या...
No comments:
Post a Comment