विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 10 November 2020

राजमाता जिजाबाई

 मराठा राज्याची स्थापना ही भारतीय इतिहासातील अद्वितीय घटना आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये या राज्याची स्थापना झाली, तेथे कूठेही हिंदूंचे राज्य नव्हते. महाराष्ट्र प्रदेश पूर्णपणे मुस्लिम सत्तांच्या नियंत्रणात होता. एक पराभूत मनोवृत्ती येथे निर्माण झाली होती. अशा या अंधारमय काळात येथे हिंदूचे राज्य निर्माण करण्याचे स्वप्न पाहणारी स्त्री म्हणजे राजमाता जिजाबाई होय.


राजमाता जिजाबाईंनी हे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या मुलाकडे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांकडे दिली होती. स्वराज्य उभारणीच्या काळात राजमाता जिजाबाईंची भूमिका महत्त्वाची होती.


राजमाता जिजाबाई यांचा संबंध दोन कर्तबगार मराठा सरदार घराण्यांशी होता. त्यांचे माहेर हे सिंदखेडचे जाधव घराणे होते, तर सासर हे वेरूळचे भोसले घराणे होते. राजमाता जिजाऊंमध्ये लहानपणापासूनच उत्तम गुण होते. हे गुण त्यांना जाधव घराण्याकडूनच मिळालेले होते.


लखुजीराजे जाधवांच्या पदरी असलेले रामसिंग भट व त्यांचा बंधू बजरंग भट यांनी काही कवने रचली होती. त्या कवनामध्ये राजमाता जिजाबाईंची जन्मतिथी दिली आहे. ते जिजाऊंच्या जन्मतिथीचा उल्लेख करतांना म्हणतात,

“लखुजी रावांनी मुलगी व्हावी म्हणूनी
म्हाळसाराणीने बहु केले नवस
जगदंबे कृपेने झाली मुलगी म्हाळसाराणीला
तीच जिजामाता प्रसिद्धी सर्वाला”

या कवनानुसार सिंदखेड जि. बुलूढाणा येथे फसली सन १००७ च्या पौष पौर्णिमेला सुर्योदयाच्या समयी रोज गुरूवार १२ जानेवारी १५९८ ला सकाळी ६ वाजेच्या सुमारास राजमाता जिजाबाई यांचा जन्म झाला. (संदर्भ- बाहेकर, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ)

लहानपणापासूनच मराठाराजांनी केलेल्या लढाया, पराक्रम, त्यांनी केलेला साम्राज्यविस्तार हा राजमाता जिजाबाईसाठी प्रेरणादायी होता. पण नंतर मात्र मराठी राज्यावर मुसलमानांचे होणारे अत्याचार जुलुम या सर्व गोष्टी त्यांना दुःखकारण झाल्या. या सर्व परिस्थितीचा त्यांच्या बालमनावर परिणाम झाला.

यातूनच त्यांच्यात जबाबदारीची जाणीव निर्माण होण्यास सुरूवात झाली. लखुजी राजांच्या दरबारात होणारे न्यायनिवाडे, लष्करी डावपेच, युद्धाची चर्चा इत्यादी सर्व गोष्टींमुळे राजमाता जिजाबाईना अल्पवयातच अनुभवातून आणि कूटुंबाच्या संस्कारातुन परिपक्वता प्राप्त झाली होती. एकंदरीत राजमाता जिजाबाईना बालपणीचे शिक्षण हे रूढीप्रमाणे मिळाले होते. आणि अत्यंत चांगल्या प्रकारे त्या संस्कारित झाल्या होत्या.

Post by -: @maratha_riyasat

#maratha #marathi #maharashtra #marathahistory #shivajimaharaj #shivajimaharajhistory #मराठी #मराठा #इतिहास #history #म #jijau #jijamata #maratha96k 

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...