विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 24 November 2020

शिंदे घराण्याचे राजचिन्ह

 


शिंदे घराण्याचे राजचिन्ह

हे शिंद्यांचे मूळ राजचिन्ह होय. सन १८८४ च्या Postal convention पासूत ते बहुदा सर्वांच्या परिचयाचे झाले. पण ते कोणी, कधी व कसे धारण केले या विषयी लेखी आधार उपलब्ध नाही. शिंद्यांच्या दौलतीबरोबर राणोजीपासून त्याचा उगम झाला अशी सर्वसाधारण समजूत आहे ती निराधार आहे असे दिसत नाही. तत्संसंबंधी तूर्त पुढे पुरावा येत नसला तरी पानिपता पासून सुसंगत सुगावा मात्र लागतो. तो असा की, 'जरी पटका' म्हणून जो मुख्य ध्वज शिंद्यांच्या आहे. त्याचे मध्यमागी 'शेषचिन्ह' असल्यामुळे सैन्यातील सर्व निशानावर ते साहजिकच आरूढ झाले. 'जरिपटका 'पानिपतच्या वेळी गेल्याची दंतकथा आहे. ती कदाचित खरी असली तर त्याजागेवर जुने चिन्ह गेले असेल पण तदोत्तर जो जरीपटका निर्माण झाला त्यात धारण केलेले चिन्ह आजमितिस ही पाहावयास मिळते.
॥ पुढे नागाचे निशान फडके, फिरंग्याचा लोळा निघाला दौलतराव बाळ ॥
असे खार्ड्याच्या एक अप्रकाशित पोवाड्याचे कडवे आहे. तसेच-
॥ जोतिबा देण आहे प्रसन्न ज्याला वडिला वडिली पासून॥
॥ बंशाचा नक्षा एक सारखा हा काल पहिल्यांचा पासून॥
॥ नागांची निशाणे हत्तीवर लाऊन जरी पटका वर कसून॥
असे वर्णन परशुराम कवीने दिले आहे.
नाग व सुर्य हे शिंदे यांच्या राजचिन्हात आवतारित आहेत त्यातील सुर्याविषयी विचार करता 'अलामत सिंदिया' पलिकडे संदर्भ लागत नाही. मग हा शेषविष्टीत सूर्य कधी आला ?
जनकोजी, केदारजी व महादजी शिंद्यांच्या मुद्रात चंद्र व सूर्य आले आहेत. अर्थात पानिपतच्या काळी याचा प्रचार होता हे निश्चित, पण हा सुंदर शेषसूर्यज्ञसंगम झाला कधी हे सांगणे कठीण आहे. 'रत्नागिरी' येथील “श्री जोतीबा' हे शिंद्यांचे कुलदैवत आहे. ज्या देव्हार्यात मूर्ती विराजमान आहे तिच्या पाठीमागील कमानीचे मध्यमागी मुर्तीच्या शिरावर प्रामुख्याने 'शेषचिन्ह' कोरलेले आहे. ते नवे किंवा जुने ते सांगता येत नाही. यावरून अनुमान निघु शकतो की शिंद्यांनी 'राजमुद्रा' व 'राजजिन्ह' धारण करते वेळेस ' श्री जोती स्वरूप' म्हणजे 'जोतिबा' अर्थात 'सूर्य' असा शाब्दिक शास्त्रोक्त अर्थ देऊन त्याच्याशी शेषाचा संबंध जुळविला असावा.
"नागवंशातिलक भोगावतीपूरवरा धीश्वर' या शिलालेखातील शब्दावरून नागवंशाची कल्पना निघालेली असावी, नागवंशात मुख्य कुल शिंद्यांचे आहे. हे प्राचीन काळापासून लढाईवाले मराठे आहेत. शिंदे हा 'शेंद्रकांचा' उच्चार आहे. कर्नाटकाचे शिंदे व कह्राडाचे शिंदे अशा दोन शाखांचे शिलालेख उपलब्ध आहेत. या लेखात वंशाला नाव देणारा मुळ पुरुष शिंदे सांगितला असूत त्याची उत्पत्ती भिन्न रीतीने सांगितली आहे. नावावरून किंवा ध्वजावरून काल्पनिक उत्पत्तीकथा भाट बनवित असत. तेव्हा शिंद्यांच्या मुद्रेत साप व कुळाचे नाव शिंदे तेव्हा मूळ पुरूष अहिछात्रात नागापासून किंवा सिंधु नदी जवळील शिवा पासून उत्पन्न झाला असे भाटानी ठरवले. तरी दोन्ही कथांचा मेळ (ऐतिहासिक) घालता अहिछात्रा जवळच्या देशातून शिंदे हे उत्तरेकडून आलेले आर्य क्षत्रिय आहेत. त्यांच्या मुद्रेत सूर्य पन आहे. तेव्हा ते सुर्यवंशी क्षत्रिय असावेत असा अनुमान निघु शकतो. यात मार्मिक विचार प्रकट आहेत. वेधर्मी वि.वि नुसार शिंद्यांना प्राचिनत्व दिले आहे त्यासंबधी लेखी आधार दिलेला नाही, शिंदे हे मुळ शैव संप्रदायी मानले जातात.
(वरील उतारा संस्थान कोटा येथील शिंदे सरकारचे वकील
गुलगुले यांचे दफ्तरातील शिंदे घराण्याचा पत्रव्यवहार १७४० ते १८६४ विक्रम व संपादक आनंद भाऊ फाळके यांच्या पुस्तकातुन पान १ ते ५ यामधुन घेतला.)
- मराठ्यांच्या इतिहासातील महादजी शिंदे यांचे योगदान : एक अभ्यास (शोधनिबंध)

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...