शिंदे घराण्याची वंशावळ
मराठ्यांच्या इतिहासात ज्या घराण्यानी नेत्रदीपक कार्य केले अशा शिंदे घराण्याचा व शिंदे घराण्यातील पुरुषांचा उदय उत्कर्ष कसा झाला ते आपण पाहूयात.
वैद्य चि. वी. या विद्वानांनी शिंदे यांच्या उदयासंबंधी म्हटले की, "शिंदे हे प्राचीन काळापासून लढाईवाले मराठे म्हणून प्रसिद्ध आहेत. शिंदे हा सेंद्रकांचा प्राकृत उच्चार असून बदामीच्या पूर्व चालुक्यांच्या वेळेस ते सेंद्रक म्हणून प्रसिद्ध होते.
कर्नाटकचे शिंदे व कराडचे शिंदे अशा दोन शाखांचे शिलालेख उपलब्ध असून यात मूळ पुरुषाची उत्पत्ती भिन्न सांगितली आहे. याच प्रमाणे माधवराव शिंदे यांचे चरित्रकार नातू सुद्धा, "शिंदे हा शिसोद्यांचा अपभ्रंश आहे" असा अनुमान काढतात. पण त्यास आधार दाखवत नाहीत.
तसे पाहिले तर मराठ्यांच्या पूर्वइतिहासात शिंदे आडनावाची पुष्कळ लोक पुढे आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरी नेमाजी शिंदे हे एक सुभेदार होते. तर थोरले राजाराम महाराजांच्या कारकीर्दीत नरसोजी व जिवाजी पाटील शिंदे हे पुरुष पुढे आले होते. तर खुद्द शाहू महाराजांच्या दोन बायका औरंगजेबाने करून दिल्या होत्या त्यापैकी एक कन्हेरगड येथील शिंदे पाटील घराण्यातील होती. पुढे शाहू महाराज सुटका होऊन दक्षिणेत परत आले तेव्हा त्यांस भेटून सामील झालेल्या सरदारांत नेमाजी शिंदे हा पुढारी होता.
कन्हेरखेडकर शिंद्यांखेरीज अनेकही शिंदे पुष्कळ होते. व या अनेक शिंदे घराण्यांपैकी कन्हेरखेड कराची एक शाखा होय. या शाखेतील मूळ पुरुषाचे नाव महादजी शिंदे असे सापडते. हा महादजी शिंदे म्हणजे पाटीलबाबा नसून त्यांच्यापासून सात पिढ्या पूर्वीचा पूर्वज होय.
शिंदे घराण्याचा राजकीय उत्कर्ष राणोजी शिंदे यांपासून झाला असे दिसते. घरची परिस्थिती बेताची असल्याने नशीब आजमावण्यासाठी किंवा त्याचप्रमाणे शक्य आहे की परिस्थितीपेक्षा महत्त्वकांक्षा हे कारण प्रभावी ठरले असेल.
कारण शाहू महाराज मोगलांच्या कैदेतून सुटून आलेले व औरंगजेबाचा मृत्यूनंतर मोगलांत पेटत असलेले वारसा युद्ध व त्यात ताराबाईंनी मराठा राज्य शाहूंच्या स्वाधीन करण्यास दिलेला स्पष्ट नकार. या झंजावती काळात हुन्नर हुशारी व शौर्य अंगी असलेल्या पुरुषांस पुढे येण्यास प्रचंड संधी होती.
तेव्हा राणोजी शिंदे यांनी बाळाचे विश्वनाथ यांच्या गोटात नोकरी पत्कारली परंतु इथे राणोजी शिंदे यांचा संबंध प्रथम कोणाशी कसा व केव्हा आला याविषयी बरेच मतभेद आहेत. बखरकार व इतिहासकारांनी राणोजींचा संबंध बाळाजी विश्वनाथ तर काहींनी बाजीरावांशी लावला
- मराठ्यांच्या इतिहासातील महादजी शिंदे यांचे योगदान : एक अभ्यास (शोधनिबंध)
No comments:
Post a Comment