विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 31 January 2021

३० जानेवारी १७१५ सरखेल कान्होजींचा दरारा...🚩


 ३० जानेवारी १७१५ सरखेल कान्होजींचा दरारा...🚩

कान्होजी आंग्रे आणि शाहू राजे (पहिले) यांच्यामध्ये १६ नोव्हेंबर १७१३ रोजी तह झाला सातारकर छत्रपतींची कोकणची जहागीर मोगलांपासून सुरक्षित राखण्याची जबाबदारी छत्रपती पहिले राजाराम यांनी सिधोजी घोरपडे यांचेवर सोपविली होती परंतु हे जोखमीचे काम घोरपडे पार पाडू शकले नाही आणि पुढे ही जवाबदारी कान्होजींवर आली...
मोगलांच्या जुलमापासून मुक्त केलेल्या कोकणातील जहागिरीला राजमुद्रेची संमती मिळाली म्हणून कान्होजी आंग्रे यांचे समाधान झाले तर आपले हितसंबंध राखण्यासाठी आपला एक कर्तबगार प्रतिनिधी आपण कोकणासाठी मिळविला असे समाधान शाहू छत्रपतींना झाले...
१७१३ मध्ये कान्होजींना जो प्रदेश दिला गेला त्यात सिद्दीचा काही प्रदेश दिला गेला होता यामुळे कान्होजी आणि जंजिरेकर सिद्दी यांचे युद्ध झाले सिद्दीचे परिपत्य करण्यासाठी कान्होजींना इ.स १७१३ ते १७१५ पर्यंत खूप परिश्रम करावे लागले अखेर ३० जानेवारी १७१५ मध्ये कान्होजी आणि सिद्दी यांमध्ये तह झाला त्यात...,
१).“मामलत तळे व गोरेगाव, गोवेळ व निजामपूर या महलांवर आंग्रे यांना एक हजार रुपये कर मिळाला. तळेपैकी ८००, गोरेगाव ६००, गोवळ १०००, तर्फ निजामपूर १७५ मिळून रुपये २५७५ पैकी १००० रूपये कान्होजींना मिळाले...”
२).“तर्फ नागोठणे, अष्टमी पाली, आश्रेधार पेटा व अंतोणे यांतील निम्मा वसूल कान्होजींनी घेण्याचे ठरले...”
या तहाने आपली सत्ता कमी झाली हे शल्य जंजीरेकराचे मनात सलत राहिले आणि त्याने कान्होजींचा पराभव करण्यासाठी मुंबईकर इंग्रजांची मदत घेण्याचा उपक्रम केला इंग्रजांनी मदत केली देखील परंतु कान्होजीं पुढे त्या दोघांचे काही चालले नाही...

No comments:

Post a Comment

सज्जनगडाचा "किल्लेदार जिजोजी काटकर"

  सातारा शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर उरमोडी उर्फ उर्वशी नदीच्या खोऱ्याच्या किनाऱ्यावर उभा असलेला “परळीचा किल्ला उर्फ सज्जनगड”... ●...