विनोद जाधव एक संग्राहक

Sunday 28 February 2021

#२२_जानेवारी_१६९३ जुल्फिकार खानचा पराभव

 


#२२_जानेवारी_१६९३
जुल्फिकार खानचा पराभव
स्वातंत्र्य लढा सरसेनापती संताजीराव घोरपडे
धनाजीराव जाधवराव , बेळगाव-धारवाड करत कर्नाटक प्रांतात नेला, नंतर ह्यांनी जिंजीकडे आपला मोर्चा वळवला.
जिंजी किल्ल्यास जुल्फिकार खान, त्याचा बाप असद खान, आणि शहजादा कामबक्ष वेढा घालून बसले होते. संताजी साधारण १५ हजाराचे घोडदळ घेऊन, तर धनाजी साधारण १० हजाराचे घोडदळ घेऊन जिंजीस थडकले.
प्रथम धनाजी आपली फौज घेऊन सामोरे आले आणि मोगली सैन्यावर हल्ला केला.
मागून येणाऱ्या संताजीस अलिमर्दाखान आडवा आला. अलिमर्दाखान हा जिंजीच्या मोगली फौजेला रसद पुरवीत असे, त्याची रसद मारीत संताजी पुढे निघून गेले.
या लढाईची फ्रेंच गव्हर्नर मार्टिन याने आपल्या डायरीत नोंद केली आहे. संताजी आणि धनाजी यांच्या या जोशासमोर मोगल सैन्याची दाणादाण उडाली.
जिंजीच्या मोगली सैन्याचीतर वाताहत झाली. त्यांची रसद तोडली गेली, अफवांचे पीक उठवले जाऊ लागले होते, त्यात किल्ल्यातून मोगली फौजेवर हल्ले होऊ लागले.
स्वतः जुल्फिकार खान रसद आण्यास बाहेर पडला असता त्याचा सामना संताजी बरोबर झाला. जुल्फिकार खान कसाबसा आपला जीव वाचवत परत छावणीत आला.
जुल्फिकार खानने संताजीकडे वाट मागितली आणि जिंजीचा वेढा उठवण्याचा वायदा केला. २२ जानेवारी १६९३ रोजी हुकमाची वाट न पाहता मोगली सैन्य जिंजी सोडून वांदीवाश येथे निघून गेले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
@sarsenapati_santaji_ghorpade

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...