विनोद जाधव एक संग्राहक

Saturday 27 February 2021

हैदराबाद संस्थान (निजामशाही ) आणि मराठा साम्राज्य भाग ५

 





हैदराबाद संस्थान (निजामशाही ) आणि मराठा साम्राज्य
भाग ५
हैदराबाद, मोगल, मराठे, टिपू, ब्रिटिश आणि निजाम
आसीफ जाहच्या आधीच्या मोगल-मराठा संघर्ष काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत मराठी फौजांनी काही स्वाऱ्या गोदावरी खोऱ्यात केल्याचे व मोगल अधिपत्याखालील प्रदेशात लुटी केल्याचे उल्लेख आढळतात. नेताजी पालकर-इ.स. १६६२, प्रतापराव-इ.स. १६७० बेरार, ऑक्टोबर इ.स. १६७२ रामगीर जिल्हा करीम नगर, ऑक्टोबर इ.स. १६७४ शिवाजी - बेरार. स्वतः छत्रपती शिवाजीने इ.स. १६७७ गोवळकोंड्याला भेट करून कुतुबशहाशी करार केले.
साताऱ्याचे छत्रपती शाहूंचे कारर्किर्दीत दिल्ली दरबारी होत असलेल्या गादीच्या संघर्षात यशस्वी बाजू घेतल्याने काही काळ मराठवाड्याचाचा काही भागाचे चौथ (शेतसाऱ्याचा चौथा हिस्सा) घेण्याचे अधिकार मिळाले, पण भावी निजाम असिफ्जहाने कोल्हापूर आणि सातारा संघर्षाचा फायदा घेऊन काही मराठा सरदार स्वतःकडे वळवले व चौथाई देणे बंद केले. तसेच दिल्ली दरबारातील संघर्षाच्या आणि स्वतःच्याचे सैनिकी यशाच्या बळावर इ.स. १७२४ पर्य़ंत स्वतःला स्वतंत्रपणे निझाम या नावाने प्रस्थापित केले.
छत्रपती शाहूंनी रघुजी भोसलेंना फुटीर मराठा सरदारांच्या मागावर पाठवले. मराठा-निजाम संघर्षात निजामास पालखेडच्या लढाईत इ.स. १७२८ मानहानी सहन करावी लागली. तर इ.स. १७३३ मध्ये भास्कर व रघुजी भोसलेंच्या ३०,००० मराठा फौजेस नांदेड निझामाबादचे आक्रमण सोडून माघार घ्यावी लागली. इ.स. १७३७ मध्ये बाजीरावाने भोपाळ येथे निजामाचा पराभव केला. पण निजामाने दक्षिणेत आपले नियंत्रण व्यवस्थित प्रस्थापित केले.
असिफ्जहाच्या मृत्यूनंतर निजामाच्या वंशजांमध्ये झालेल्या संघर्षात सलाबतजंगची बाजू घेऊन मराठ्यांनी पुन्हा चौथाईचे अधिकार मिळवले. पण सलाबातजंग गादीवर टिकू शकला नाही. नंतर आलेल्या निझाम अली या निजामास १७६३च्या राक्षसभुवनच्या लढाईत मराठ्यांनी पुन्हा नमवले. परंतु इ.स. १७६६ आणिइ.स. १७६८ साली ब्रिटिशांशी करार करून संरक्षणाच्या बदल्यात ब्रिटिशांची मांडिलकी करणे निझाम अलीने पसंद केले.इ.स. १८०३ मध्ये शिंदे, होळकर, भोसले या त्रयीने पुन्हा एकदा निजामास आव्हान दिले, पण अडगावच्या लढाईत मराठ्यांना पराभव झेलावा लागला. इ.स. १७९९ मध्ये टिपू राज्य संपले. इ.स. १८१८ मध्ये पेशवाई संपली. पेशवाईच्या अस्तानंतर निजामशाही पुढे १३० वर्षे टिकली पण ब्रिटिश म्हणतील ती पूर्व दिशा ठरली.
हैदराबाद संस्थानाचे चार प्रशासकीय विभाग होते. आणि एकूण मिळून १६ जिल्हे होते.
अ] औरंगाबाद विभाग-
१. औरंगाबाद जिल्हा २. बीड ३. नांदेड ४. परभणी
आ] गुलबर्गा विभाग-
५. गुलबर्गा ६. बीदर ७. उस्मानाबाद ८. रायचूर
इ] मेडक विभाग-
९. अतराफ इ बलदाह १०. महबुबनगर ११. मेडक १२. नलगोंडा १३. निझामाबाद
ई] वरंगळ विभाग-
१. वरंगळ २. आदिलाबाद ३. करमनगर

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...