विनोद जाधव एक संग्राहक

Saturday 27 February 2021

हैदराबाद संस्थान (निजामशाही ) आणि मराठा साम्राज्य भाग ३

 


हैदराबाद संस्थान (निजामशाही ) आणि मराठा साम्राज्य
भाग ३
निजामशाहीची स्थापना
इ.स. १६८७च्या दख्खन स्वारीत बादशहा औरंगजेबाच्या सैन्यातला चिन खालीच खान नावाचा सैनिक गोवळकोंडा किल्ल्यास घातलेल्या वेढ्यात जखमी होऊन मेला. चिन खालीच खानचा मुलगा नवाब गाझिउद्दीनखान हा औरंगजेबाचा पंतप्रधान सादुल्लाखानचा जावई होता. औरंगजेबाने नवाब गाझिउद्दीनखानचा मुलगा मीर क़मरुद्दीन यास औरंगजेबाने बालपणीच मनसब दिले होते. तरुणपणी त्याचे चिन फ़तेखान असे नामाभिदान केले. वयाच्या २६व्या वर्षी त्याला विजापूर आणि मावळचा निझाम बनवले नंतर संपूर्ण दख्खनची जबाबदारी त्यास दिली. औरंगजेबानंतर झालेल्या बादशहा फारुखसीयने त्यास निजाम उल मुल्क तर त्यानंतरच्या बादशहाने त्यास असिफ्जाह असे नाव दिले.
पण दिल्लीच्या बादशहानेच त्याला शह देण्याकरिता इ.स. १७२४ मध्ये एक लढाई घडवूवुन आणली ज्यात मीर कमरुद्दीन खान सिद्दिकीचा विजय झाला आधिच कमकुवत झालेली दिल्लीची बादशाही मीर ओमारुद्दीनची प्रगती थांबवू शकली नाही.
मीर ओमारुद्दीन / निजाम उल मुल्क/असिफ्जाहने आधी आपली राजधानी औरंगाबाद येथे ठेवली व लवकरच हैदराबाद येथे हलवली. हे राज्य सात त्याच्या सात पिढ्यांनी इ.स. १७२४ ते इ.स. १९४८ या काळात उपभोगले. असिफ्जाहने इंग्रज आणि फ्रेंच दोंघांशी चांगले संबंध ठेवले व मराठ्यांशी युद्धे करून स्वतःची गादी मजबूत केली. २१ मे १७४८ रोजीच्या त्याच्या निधनानंतर सत्तेच्या साठमारीत फ्रेंच व ब्रिटिशांनी वेगवेगळ्या वंशजाना पुढे करून परिस्थिती काही काळ अस्थिर ठेवली. नसीरजंग, मुज्जफरजंग, सालाबाथजंग आणि निझाम अली यांनी १३ वर्षे जम बसवण्याचा प्रयत्न केला. त्यात निझाम अली १७६३मध्ये निझाम झाला व नंतरची ४० वर्षे त्याने राज्य केले. हैदराबाद संस्थानात २२४ वर्षे राज्य करणारे घराणे समरकंद या मध्य आशियातील शहरातून आलेले, मुळात बगदादचे होते.[२]
मीर उस्मान अली खान हा शेवटचा निजाम होता. बऱ्याचदा तो 'हिंदू आणि मुस्लिम हे त्याचे दोन डोळे आहेत', असे म्हणे.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...