विनोद जाधव एक संग्राहक

Saturday 27 February 2021

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी काशिबाई राणीसाहेब

 



छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी काशिबाई राणीसाहेब 
लेखन :
डाॅ. सुवर्णाताई नाईक निंबाळकर ( वैराग /पुणे )
संदर्भ शिवपत्नी महाराणी सईबाई
 
शिवरायांचा सातव्या पत्नी काशिबाई राणीसाहेब. छत्रपती शिवाजी महाराज यांचा विवाह काशीबाई जाधव यांच्याशी शके वैशाख शुद्ध पंचमीला ८/४/१६५७रोजी राजगडावर जिजाऊसाहेबांच्या उपस्थितीत पार पडला .काशीबाई साहेबांचा जन्म सन १६४८ मध्ये जाधव राव घराण्यात झाला. काशीबाईसाहेब सुज जाधव यांच्या कन्या होत. संताजी जाधव म्हणजे जिजाऊंचे भाऊ अचलोजी यांचे द्वितीय पुत्र, सुजनसिंह जाधवराव ( सुजनसिंह ह्याचे पुत्र म्हणजे,शुरवीर शंभुसिंह,जाधव आणि त्या पुत्र म्हणजे सरसेनापती धनाजीराव जाधवराव ) यांच्या कन्या म्हणजे काशीबाईसाहेब.
जिजाऊंचे वडील लखुजी जाधव राव व बंधू अचलोजी जाधव राव या दोघांनी जाधवराव घराण्याला १७व्या शतकाच्या आरंभी मोठी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली होती. दौलताबाद व सिंदखेड राजा मुलुख इत्यादी भागात त्यांचा मोठा दरारा होता, पण दौलताबादेस निजामशहा कडून विश्वासघाताने लखुजी जाधव राव व त्यांचे दोघे पुत्र अचलोजी, रघुजी आणि नातू यशवंतराव हे सर्व पुरुष एकाच वेळी मारले गेले .या प्रकारानंतर अचलोजींचा अल्पवयीन मुलगा सुजनसिंह जाधवराव यांचे पालन पोषण जिजाऊसाहेबांनीच रायगडावर केले. सुजनसिंह राजगडावरच राहिले होते ( हे,सुजनसिंह कनकगिरी च्या युध्दात शहीत झाले ). त्यामुळे त्यांच्या कन्या काशीबाई साहेबांचा विवाह मोठ्या थाटामाटात राजगडावर करून जिजाऊसाहेबांनी जाधव भोसले संबंध परत एकदा जवळ केले काशीबाईसाहेब यांना अपत्य नव्हते. त्यांचा मृत्यू ६ फेब्रुवारी १६७४मध्ये पाचाड येथे झाला..काशिबाई राणीसाहेब यांची समाधी पाचाड येथे कुशावर्त तलावाच्या ऊत्तरेस आहे.
🙏काशिबाई राणीसाहेब यांना आमचा मानाचा मुजरा 🙏

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...