विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 24 March 2021

छत्रपती शिवाजी महाराज आणि इंग्रज अधिकारी जॉन चाईल्ड याची राजापूर येथे भेट

 

२५ मार्च १६७५......
१६७४ मध्ये रायगडावर झालेल्या तहानुसार इंग्रजांनी राजापुरास जाऊन आपले बस्तान बसवन्याचा प्रयत्न चालवला होता त्यावेळी दक्षिण कोकणचा सुभेदार अण्णाजी दत्तो होता त्याने राजापुरात वखारीसाठी चार नव्या जागा दाखवली त्यापैकी एक जागा इंग्रजांनी पसंत केली पण त्या जागेवर नवी वखार बांधण्याचा खर्च मराठयांनी द्यावा अशी इंग्रजांनी मागणी केली होती पुढे मार्च १६७५ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण कोकणच्या स्वारीवर असताना जॉन चाईल्ड या इंग्रज आधिकार्यानी राजापूर मुक्कामी महाराजांची भेट घेतली व मागण्या सादर केल्या...
या भेटीबद्दल इंग्रज एप्रिल १६७५ मध्ये लिहतात...,
“आम्ही शिवाजीराजेंना २०० होणांचा नजराणा दिला व आमच्या मागण्या त्यांना वाचून दाखवल्यावर त्यांनी फर्मान देण्याचे कबूल केले पुढे राजे संध्याकाळी निघून गेला”...

छत्रपती शिवाजी महाराज आणि इंग्रज अधिकारी जॉन चाईल्ड याची राजापूर येथे भेट झालेली इतिहासात नोंद असलेली ती तारीख होती २५ मार्च १६७५......
➖➖➖➖➖➖➖➖➖
डॉ जयसिंगराव पवार (मराठा सत्तेचा उदय)...

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...