विनोद जाधव एक संग्राहक

Friday 30 April 2021

सूर्यवंशी मराठा घराणे बर्गे (उपनाव निकम) भाग २

 


सूर्यवंशी मराठा घराणे बर्गे (उपनाव निकम)
भाग २
( निकुंभ हे राजे रघुवंशी असल्याचे दावा करतात व ते अयोध्येहुन राजस्थानला आले. धूंदू नावाच्या राक्षसला मारुन धुंधर उर्फ़ जयपुर वसवनारे ते राजस्थानच्या पहिल्या आर्य लोकांपैकी आहेत. मराठा निकम हे निकुंभ राजे वंशज असल्याने त्यांचे खानदेश वर तसेच राजस्थान येथील भागावर स्वामित्व होते. पुढे राजस्थान येथील राज्य त्यांनी गमावले. खानदेश वर मात्र निकुंभानी अनेक शतके राज्य केले ८ व्या शतकापासून ते अगदी आजपर्यंत बरेचसे लोक तेथे आहेत. अल्लशक्ति , वैरदेव, कृष्ण आदि महत्त्वाचे राजे या घराण्यातून झाले.) [१], [२]
==प्रसिद्ध मराठा सरदार बर्गे मंडळीची नावे
सरदार आनंदराव बर्गे
सरदार क्षेत्रोजीराव बर्गे
सरदार तुलाजी उर्फ़ तुळाजीराव बर्गे
सरदार खंडोजीराव बर्गे
सरदार सेखोजीराव बर्गे
सरदार राणोजीराव बर्गे
सरदार सखाराम बर्गे
सरदार बालोजीराव बर्गे
सरदार हैबतराव बर्गे
सरदार येसाजीराव बर्गे
सरदार सिदोजीराव बर्गे
सरदार साबाजीराव बर्गे
सरदार जानोजीराव बर्गे
ही वरील उल्लेखि नावे केवळ उंच शिखरांची आहेत आणि खरे पहु गेले असता यापेक्षा अनेक बर्गे सरदार व त्यांचे घराणे कर्तबगार असूनही त्यांच्याविषयी फारच कमी लिहिले, ऐकले व बोलले गेले. मराठा सरदार बर्गे यांचा इतिहास कागदोपत्री बंदिस्त आहे. तो समजल्यास मराठेशाही इतिहासात मौलिक भर पडेल.
ऐतिहासिक बर्गे घराणे व त्यांचा संक्षिप्त इतिहास :
बर्गे हे बहमनी आमदनी पासून मशहूर असे पराक्रमी घराणे होय. यांनी दख्खनची सुल्तानशाही ज्यात आदिलशाही, निज़ामशाही राजवटीत शौर्य गाजवून वैभव, इनाम वतने व लौकिक मिळवला. बर्गे यांचे कोरेगाव हे प्रान्त वाईतील महत्त्वाचे ठिकाण होते. संमत कोरेगाव, तालुका कोरेगाव, तसेच प्रांत कोरेगाव अशा आशयाचे संदर्भ सापडतात. विविध राजवटीत कोरेगाव तसेच चिंचनेरचे वंश परंपरागत पाटिलकि हक्क, अनेक दुर्मिळ किताब, मान मरातब, जहागिरी, सरंजामी हक्क त्यांना होते. सुल्तानशाही, शिवशाही, मराठा स्वातंत्र्य युद्ध , शाहू काळ, पेशवाई , संस्थानी राजवटी अशा अनेक कालखंड पराक्रमा ने गाजवणारया प्रमुख मराठा घराण्यात त्यांचे मानाचे स्थान आहे. बर्गे घराण्याने अनेक युद्धांत मराठा साम्राज्याची सेवा केली त्यात प्रामुख्याने मराठा स्वातंत्र्य युद्ध, जंजिरा मोहीम, पानिपत, खर्डा इत्यादी महत्त्वाच्या घटना होत. अनेक पोवाड्यात बर्गे वीरांचे गुणगान आढळते. एकंदर इतिहासावरून बर्गे घराण्याला पाटील, सरदार, इनामदार, जहागीरदार, सरंजाम वतनदार, खासबरदार अशा दुर्मिळ पदव्यांनी गौरवलेले दिसते तसेच सरदार बर्गे घराण्यातील शुरवीर पुरूषानी हिंदवी स्वराज्य रक्षणार्थ जी शस्त्रे धारन (वापरले) ती शस्त्रे आजही बर्गे वंशजाकडे आहेत फार दुर्मीळ ठेवा जपुन ठेवले आहे. तो दुसर्या दिवशी पाहायला मिळतो.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...