विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 16 April 2021

◆सर्फराजी◆


 ◆सर्फराजी◆

राज्याभिषेक समारंभासाठी उदंड खर्चवेच झाला. खजिना रोडावला तो भरून काढण्यासाठी हंबीररावांनी मोहीम काढली. अहमदाबाद ,खानदेश भागात संपत्ती अमाप जव्हार - रामनगरच्या लढाऊ भिल्लांना झुकांडी देत मराठे अहमदाबाद प्रांतात घुसले. मुलूख लुटून त्यांनी शहरं मारली ,खंडण्या घेतल्या तिथून नर्मदा पार करून बुर्हाणपुरावर अवचित त्यांनी धाड टाकली. तिथले पुरे लुटून ते माहूरला आले . चौथ, सरदेशमुखीसह चिक्कार खंडण्या गोळा केल्या. जालन्यावर हात मारून अन् सिंदखेडची खंडणी दबावून झपाट्याने ते गोदातीरी येऊन पोहचले. तोवर मोगल सरदार दिलेरखान मोठं सैन्य घेऊन त्यांना आडवा आला. हंबीररावांनी त्याच्याशी मोठी लढाई देणं टाळलं लुटीने लादलेली जनावरं सांभाळत ते पुढे निघाले. लहानसहान चकमकी करत दिलेरला त्यांनी चकवलं आणि लूट एकदाची स्वराज्यात आणली. त्यांनी ओतलेल्या धनाच्या अमाप राशी पाहून महाराज खुश होत म्हणाले,
गनिमाला दबावून यश घेऊन परतलात. सरलष्करीचा शकून तर फार चांगला झाला.
दरबारात हंबीररावांचा त्यांनी यथोचित सत्कार केला, तेव्हा मुजरा करत राव म्हणाले,
आमच्या सेवेचा मजूरा झाला. पण ज्या आमच्या मर्दांनी जीवित तृणवत मानून तलवार गाजवली, त्यांचाही मान झाला पाहिजे,
आम्हाला वाटतं त्यांचा मनजोगता मानमरातब आम्ही केलाय.
" एका वीराचा पराक्रम त्यापलीकडचा आहे महाराज, "
असं ? बोला हंबीर , कोण आहे तो बाजीगर .?
सगळ्यांचं लक्ष हंबीररावांवर खिळलं. असा कोण मोहरा या मातब्बर सेनापतीच्या मनात भरला ? मानाजी मोरे की रुपाजी भोसले ? मकाजी आनंदराव की संताजी जगताप ? धनाजी जाधवही हंमतमेने झुंजला. सिधोजी निंबाळकराने पराकोटीचा पराक्रम केला. यातला कोण तो कर्णाच्या प्रतिमेचा योध्दा ?
हंबीररावांनी सांगितले, संताजी घोरपड्यांने दाखवलेल्या शौर्याला तुलना नाही.
दिलेरखानाच्या पहाडासारख्या पठाणांचा सारा कसला त्याने आपल्या अंगावर घेतला म्हणून लूट सुखरुप पुढे पाठवता आली. संकटसमयी व्यक्तिगत शौर्य दाखवणं वेगळं नि कटकाचं पुढारपण घेत अस्कर्याचा गनिम जाग्यावर ठाणबंद करणं वेगळं. संताजीसारख्या एका स्वारानं ते केलं. हा करीना सामान्य नव्हे. साहेबांनी पागेकडील जुमल्याची मामलत सांगून त्याचा यथोचित गौरव करावा अशी आमची विनंती आहे.
" मंजूर सबनीसांनी नोंद घ्यावी . हुकुमाचा कागद उद्यापर्यंत त्यांनी आमच्या समोर ठेवावा.
महाराज बोलले आमच्या दोन डोळ्यांनी आम्ही
आम्ही कुठे कुठे लक्ष ठेवणार ? मंत्री ,सेनापती, सरदार हेच आमचे डोळे. ते जागे असतील तर संताजींसारखी मातीआड दडलेली माणकं या स्वराज्यात कीर्तीच्या मुकुटात मानाने मिळवतील.
हंबीररावांच्या शिफारशीमुळे संताजींला जुमलेदारीची मामलत मिळाली . आता त्याच्याकडे सव्वाशे स्वारांचं नेतृत्व आलं. वार्षिक पाचशे होनांची तैनात त्याला लाभली पागेचा कारभार बघण्यासाठी सव्वाशे होनांचा वार्षिक तनखा घेणार्या एका मजुमदाराची नेमणूक झाली. घोड्यांची उस्तवारी करण्यासाठी पाच पखाली , पाच नालबंद अशा दहा आसामी हाताखाली आल्या.
सरदारीतला पहिला टप्पा गाठला नि हंबीररावांना भेटून त्याने त्यांचे आभार मानले. वाकून त्यांचा चरणस्पर्श केला. त्याचे रुंद बळकट खांदे धरून त्याला उठवत राव म्हणाले ,
यशवंत हो . यापुढेही तुमचा पराक्रम पाहाण्याचा योग पुन्हा पुन्हा येऊ दे ,,
जरूर येईल याआधी पराक्रम केला नाही असं नाही . पण तुमच्यासारखी पारखी नजर लाभली नाही,
त्यांच्या स्वरातला दुखरा भाव जाणून राव हसले . त्याची पाठ थोपटून त्यांनी त्यांला आश्वंत केलं धनाजी जाधव ह्यांनी त्यांचं
अभिनंदन
केलं .
तुमच्या शिपाईगिरीचं चीज झालं . लष्करी दरक मिळाल्याबद्दल
अभिनंदन
,
तुमचा पराक्रमही त्याच तोलामोलाचा आहे धनसिंग . उमराणीला बहलोलखानाचं पाणी तोडून प्रतापरावांनी त्याला गुडघ्यावर आणलं तेव्हाची तुमची मर्दानगी जवळून पाहिलीय मी ,,
ते खरं. पण माणसाचं भाग्य खुलायला तशी वेळ यावी लागते राव ,,
सुरुवात पराक्रमाची पुढील भाग लवकरच ...🚩
📑 संताजी (कादंबरी) काका विधाते
लव नामदेव घोरपडे ✍️
Post - @sarsenapati_santaji_ghorpade

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...