विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 23 May 2021

फत्तेसिंह भोसले आणि शाहू महाराज

पोस्तसांभार :अभिषेक कुंभार 

 राजे तुम्ही असे उद्विग्न होऊ नकात.... हा शेवट नाही हीच तरी खरी सुरवात आहे | अमृतराव

नाही अमृतराव नाही, इतकी वर्षं दुष्मनाच्या गिरफ्त मध्ये राहून आम्हाला त्यांचा वाण नाही पण गुण लागलाच | शाहू
मालक काळजाला घरं पडत्याती, तुम्ही आस काहीबी बोलू नका, मिळल तो झाडपाला, शाडूच्या भाकऱ्या खात आम्ही शत्रूशी लढलोय कारण मराठेशाहीचा मुकुटमणी मोगलांच्या कैदेतून सोडवायचा हा एकच चंग आम्ही सर्वांनी मनाशी बांधला होता, आज तुम्ही हे असं काहीतरी, आक्रीत बोलून आमचा आवसान घात करू नका | परसोजी
मी काय बोलू आता परसोजी यावर.............
काहीच बोलू नका मालक आता यावर, युद्ध म्हटलं कि या साऱ्या गोष्टी योगायोगानं आल्याच, आणि त्यात युद्धाला तोंड फोडलं ते या लोखंड्यानं, आपण आपल्यामार्गी निघून चाललो होतो,आता चीलीमभर इस्तवानं जर रांजणात उडी घ्यायची म्हटल्यावर आपला निभाव तो काय लागणार हे ज्याला त्याला कळायला हवं ना शाहू राजे | नेमाजी
सगळेजण आपापल्या परीने शाहू राजांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते पण स्वतःच्या चुकीमुळेच का होईना पण स्वतंत्र प्रवृत्तीच्या एका किरकोळ पाटील आपल्या हातून मारला जावा ही गोष्ट राजाच्या मनाला डाचत होती. आता शेवटी राजाचचं मन ते, त्ये बी अक्षी सबंध प्रजेवर सुखाची छत्र ढाळनाऱ्या कर्तुत्ववान आज्याचा नातू तर तेवढ्याच कर्तुत्ववान पित्याचा हा पुत्र, रयतेच्या गवताच्या कडीलाही हात लावू नका असा खाक्या असणाऱ्या इमानी राज्यकर्त्यांचे हे वंशज. काही काळ मोगली कैदेत गेला तरी आंब्याच्या झाडाला आंबाच येणार ना...!
नेमाजी, परसोजी, अमृतराव तुमचे म्हणणे बरोबरच आहे पण तरीही आज मनाला राहून राहून घोर लागलाय आम्ही ज्या पारद गावच्या पाटलाला मारला त्या सयाजी लोखंडेचं बारकं मुल सारखं डोळ्यासमोर येतंय माझ्या.
शेवटच्या निकराच्या छाप्यात जेव्हा लोखंडे पाटलाच्या वाड्याचे दरवाजे तुटले त्यावेळी दृष्टीस पडलेलं एक निरागस मुलं शाहू राजांच्या मनाला घोर लावत होतं.
राजं पाटलाची, बायको तुम्हाला भेटायचं म्हणून बाहेर थांबलीये........... तुमची.....| सेवक.
पाठव तिला आत पाठव.
सेवकाचा शब्दही पुरा झाला नव्हता. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने सतर्क होऊन थांबला होता काही झालं तरी ती दुष्मनाची बायको........
राजं माझे मालक गेले, आमच्या पारदवर मोघलांची धाड आली असाच आमचा समज झाला म्हणून आमच्याकडून ही आक्रीत घडली आणि त्याची सजापण आम्हाला मिळाली बघा | पाटलाची बायको.
पाटलाच्या बायकोच्या बोलण्यानं साऱ्या तंबूत एक वेगळीच शांतता पसरली. निव्वळ गैरसमजातून झालेला हा प्रकार होता, पाटलाच्या बायकोच्या डोळ्यातन पाणी थांबत नव्हतं आणि तिच्या हाती असलेलं लेकरू एक लाथ उडवत हुंकारत होतं
कुणी काहीच बोलत नव्हतं, शाहूराजे शून्यात विचार करत बसले होते तोच पाटलाची बायको पुढे झाली तिनं आपल्या कुशीत खेळणारा लेक शाहू राजांचा पायवर घातला.... आता शाहू राजांची अवस्था अवघडल्यासारखी झाली, नक्की करावे तर काय करावे हेच त्यांना उमजत नव्हते...
पायावर पोर ठेवत पाटलीण बाई उठल्या आणि आर्जवी स्वरात बोलू लागल्या. हा माझा राणोजी, ह्या आमच्या स्वतंत्र राज्याचा वारस आज मी तुमच्या पायावर वाहिला, आता याचं चांगलं वाईट काय त्ये तुम्हीच ठरवा.
आयुष्याला नव्याने सुरवात केलेल्या शाहू राजांनी आता आपल विचार बदलला, हा आपला पहिला लढा आणि पहिली फत्तेह आणि आपल्याला सुपूर्त केलेलं हे पोरं हाच आपल्या आयुष्याचा शुभशकून
या पोराचं नावं फत्तेसिंह

अभिषेक कुंभार

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...