विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 25 May 2021

छत्रपती शिवाजी महाराज की जय


 छत्रपती शिवाजी महाराज की जय

आपण सर्व आज सर्रास छत्रपती शिवाजी महाराज की जय अस म्हणतो व कधी पासून म्हणायला सुरुवात झाली त्यामागेही एक अतिशय रोचक कथा आहे व .
१ सप्टेंबर १९३९ मध्ये युरोपात दुसऱ्या महायुद्धाची औपचारिक सुरुवात झाली व नंतर त्याचे लोण जगभर पसरले. यावेळी इंग्लंड, अमेरिका, रशिया सारख्या देशांविरुद्ध जर्मनी, इटली, जपान, स्पेन वगैरे देश सक्रियपणे लढत होते. आज एक देश दुसऱ्यावर तर उद्या तिसरा दुसऱ्यावर अशी कुरघोडी सुरू होती. या सर्व घटना पाश्चात्य जगात घडताना भारत काय करत होता ? तर भारतीय लाखो सैनिक इंग्लंडच्या बाजूने युद्धात आफ्रिका, युरोप, पूर्वभागात प्राणपणाने लढत भारताची मर्दुमकी सिद्ध करत होते.
आज पूर्व आफ्रिकेत ऍरिट्रीया (Eritea) नामक देश आहे ज्यावर त्याकाळी इटलीची अधिसत्ता होती. या इटलीशासित ऍरिट्रीयावर १९४१ मध्ये इंग्लडने आक्रमण केले आणि याभागात युद्धास तोंड फुटले.
या सैन्यात भारतीय, सुदानी सैनिकांचा भरणा चांगल्या मोठ्या प्रमाणावर होता. चौथा व पाचवा भारतीय पायदळ विभाग (4th and 5th Indian Infantry Division), सुदान डिफेन्स फोर्स (Sudan Defence Force), फ्री फ्रेंच ओरिएन्ट ब्रिगेड (Free French Orient Brigade) या सेना इंग्रजांसह या युद्धात उतरल्या ज्याला केरेनचे युद्ध म्हणतात.
६ फेब्रुवारी १९४१ रोजी इंग्लंडचे सैन्य ऍरिट्रीयाच्या केरेन प्रांतातील डोलोगोरोडॉक नामक किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचले. या सेनेने किल्ल्यास वेढा दिला व झुंज सुरू झाली पण अगदी मुघलांप्रमाणे म्हशींच्या आणि कासवांच्या गतीने. सतत ४० दिवस वेढा सुरू ठेवून यश मिळत नव्हते. तेव्हा लिटॅनंट कोलोनल Denys Reid या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली शेवटी ब्रिगेडियर Messervy यांनी १५ मार्च १९४१ रोजी ३/५ व्या मराठा लाईट इंफॅन्टरी फोर्स नेमली.
या सेनेत श्री श्रीरंग लामण नामक एक शूर सैनिक होता. या श्रीरंग लामण यांनी आपले अधिकारी Denys Reid यांच्याकडे जाऊन एक विनंती केली व ती अशी की त्यांनी या मराठी तुकडीचे नेतृत्व श्री लामण यांच्याकडे रात्रीपुरते द्यावे व मराठे रात्रीतून किल्ल्याचे शिखर जिंकून देतील. Denys Reid यांनीही यास प्रयोग करून बघू म्हणून सहमती दिली.
श्री लामण हे शिवरायांच्या मावळ धरतीतील होते व गनिमी काव्याचे त्यांना बाळकडूच जणू मिळालेले होते. त्यांनी सर्व मराठी लढवय्ये रात्रीस सिद्ध केले व पूर्वी मावळे जसे गडावर रात्रीतून चढून हल्ला करायचे तसेच केले. या दिवसापर्यंत या मराठा तुकडीचा रणघोष ' हर हर महादेव ' असा होता पण या वेळी मात्र श्री लामण यांनी एक बदल केला व त्याजागी ते म्हणाले ' बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय '. शिवरायांच्या केवळ नामोल्लेखाने मराठ्यांमध्ये वीरश्रीच संचारली व एकापाठोपाठ एक मराठे डोलोगोरोडॉक किल्ल्यावर चढले. आणि पुढे काय सांगायचे ! त्या इटालियन गनिमांना मराठ्यांनी आपले पाणी पाजले व जे ४० दिवस इंग्रज एवढ्या सेनेसह नाही करू शकले ते या मर्द मराठयांनी एकाच रात्रीत करून दाखवले.
यानंतर ६ वर्षात भारत स्वतंत्र झाला, इंग्रज गेले पण आजतागायत मराठा लाईट इंफॅन्टरी फोर्सची घोषणा ' बोला छत्रपती शिवाजी महाराजकी जय ' हीच आहे.

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...