लोणी मावळा गढी
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील लोणी मावळा गावात एक गढी आहे. लोणी मावळा हे गाव पुणे - नगर महामार्गावरील शिरूरपासून ३५ कि.मी अंतरावर आणि तालुक्याचे गाव पारनेरपासून २१ कि.मी अंतरावर आहे. गावात प्रवेश करतानाच तटबंदी दिसते आणि गावाची वेस असलेले भव्य प्रवेशद्वार, बुरूज दिसतात. गढीची तटबंदी आहे पण आतमध्ये काहीच अवशेष नाही. प्रवेशद्वारासमोर ग्रामदैवत भैरवनाथाचे मंदिर आहे. मंदिराच्या प्रांगणात असलेली वैशिष्ट्यपूर्ण दीपमाळ मन वेधून घेते. तिथेच एक वीरगळ आहे. गढीबद्दल गावकर्यांकडून माहिती मिळू शकली नाही. फक्त पाटलाचा वाडा होता एवढं समजले. लोणी मावळा बद्दल काही माहिती असल्यास जाणकारांनी प्रकाश टाकावा.
टीम - पुढची मोहीम
No comments:
Post a Comment