विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 26 May 2021

चाकण परगण्यातील गावांची यादी







 चाकण परगण्यातील गावांची यादी

पोस्तसांभार :: Prasad Shinde
------------------------------------------------------------
छत्रपती श्री संभाजीमहाराज यांच्या कार्यकाळात १६८५ साली चाकण परगण्यात दुष्काळ पडला होता. चाकण येथील हनुमान मंदिरात पाऊस पडावा यासाठी मोठे अनुष्ठान,होम-हवन करण्यात आले,यानंतर पाऊस भरपूर झाला.याची उतराई म्हणून चाकण परगण्यातील एकूण ६४ गावांतून टका १ व १ मण धान्य अनुष्ठान करणाऱ्या कचेश्वर भट यांना देण्यात आले.यासंबंधीचे एक पत्र मिळाले.चाकण परगण्यातील ६४ गावची देशमुखी हि कडु देशमुख घराण्याकडे होती.त्यावेळी
येसाजी वलद संताजी कडू देशमुख व विठोजी वलद बाबाजी कडू देशमुख देशमुखी करीत होते.या पत्रात ६४ गावांची यादी तत्कालीन काळात मोकादमी करणाऱ्यांच्या नावानिशी दिली आहे.
चाकण परगण्यातील मौजे रासे गावची पाटीलकी "विराजीराव पाटील शिंदे" करीत असल्याचे पत्रातून दिसून येते.महाराष्ट्रातील शिंदे घराण्यासंबंधी माहिती संग्रह चालू असताना या पत्राच्या माध्यमातून एक नवीन माहिती हाती लागली.या भागातील शिंदे मंडळींना व इतर घराण्यांना आपला इतिहास जाणून घेण्यासाठी हि माहिती नक्कीच उपयुक्त ठरेल.
-------------------------------------------------------------
©प्रसाद शिंदे
•संदर्भ-भारत इतिहास संशोधक मंडळ वार्षिक इतिवृत्त

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...