याच गावात गुप्तपणे वावरले छञपती...
postsaambhar ::Shardulsinh Naik Nimbalkar(सरलष्कर बहाद्दूर)
छञपती राजाराम महाराजांच्या निधनानंतर (1700 ) महारांनी ताराबाई आणि राजसबाई यांच्यामध्ये गादीसाठी संघर्ष सुरु झाल्याने महारांनी ताराबाईंनी आपला नातू जन्मताच निधन पावल्याची हूल उठऊन त्याला आपली नात दर्याबाई निंबाजीराव नाईक निंबाळकर, पानगाव ता. बार्शी जि. सोलापूर याठिकाणी ठेवले. याकामी त्यांना तुळजापुरचे नारोजी भुते कदम यांनी मोठी मदत केली. 1745 ते 1750 अशी पाच वर्षे नातू युवराज रामराजे गुप्तपणे पानगावात वावरले.
दर्याबाईंचे पती निंबाजीराव नाईक निंबाळकर हे महाराणी सईबाईंचे बंधू साबाजीराव नाईक निंबाळकर यांचे वंशज. त्यांनी पानगावात 300x300 फुट अष्टकोणी आकारात बांधलेला हत्ती तलाव आजही सुस्थितीत असून दुष्काळातही त्यात मुबलक पाणी आहे.
पुढे छञपती शाहूंचे निधन झाल्यानंतर 1750 ते 1777 पर्यंत छञपती रामराजांनी कारभार केला.यांच्याच काळात 14 जानेवारी 1761ला पानिपतचे युद्ध झाले. त्यानंतर निंबाजीराव नाईक निंबाळकर हे स्वराज्याचे सेनापती झाले व सरलष्कर पद बहाल करण्यात आले. पुढे पानगाव पेशव्यांनी पानसेंकडे दिल्याने नाईक निंबाळकर घराणे हे वैरागला स्थिरावले. छत्रपती
रामराजेंच्या कारभारात दर्याबाईंचा वारंवार उल्लेख येतो. पानगावची वेस आणि हत्ती तलाव पाहिल्यानंतर आजही छञपतींचे वास्तव्य आठवते...
रामराजेंच्या कारभारात दर्याबाईंचा वारंवार उल्लेख येतो. पानगावची वेस आणि हत्ती तलाव पाहिल्यानंतर आजही छञपतींचे वास्तव्य आठवते...
No comments:
Post a Comment