विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 14 June 2021

३१ मार्च १६८३ दरम्यान पेडगावला मराठ्यांचे वर्चस्व आणि छत्रपति संभाजी महाराजांना मिळालेले यश -


 ३१ मार्च १६८३ दरम्यान पेडगावला मराठ्यांचे वर्चस्व आणि छत्रपति संभाजी महाराजांना मिळालेले यश -

मोगल सेना औरंगजेबाच्या धास्तीने का होईना जागोजागी लढत होती. पण मराठ्यांनी तर यल्गारच मांडला होता , ३१ मार्च १६८३ या दिवशी मराठे पेडगावात धुमाकूळ घालत पुढे चाल करून येत असल्याची बातमी मोघलांना मिळाली. पुन्हा मराठ्यांचा हल्ला पेडगाववर झाला तर आलमगीर बादशहा आपली खैर करणार नाही. हे जाणून दिलावरखान , कलाबुद्दीनखान यांनी प्राणपणाने मराठ्यांचा हल्ला थोपवण्यासाठी प्रयत्न केला.
मात्र त्यात त्यांना यश न येता मराठ्यांच्या झंझावातासमोर बरेच मोगल सैन्य कामी आले. मोघलांची फार वाताहात या युद्धात झाली , सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यांचा मोघलांना सराव नसल्याने संभाजी महाराजांसमोर आपला टिकाव लागत नाही याची जाणीव मोघल सरदारांना आता चांगलीच आली होती. अवघ्या ३ वर्षातच मोघलांना कळून आले की संभाजीमहाराजांपुढे आपली वाटचाल ही यशस्वी होणार नाही.
Ref - अखबरनामा , दरबारी इतिहासकर अबुल फजल ह्यांनी नोंदणी केली
श्री राजा शंभु छत्रपति जयते

No comments:

Post a Comment

राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला 🚩 भाग 9

  राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला भाग 9 लखुजीराजे जाधवरावांची हत्या भातवडीच्या युद्धानंतर मलिक ...