सम्राट पुलकेशी साळुंखे (दुसरा) :



एक दूरदॄष्टी असलेला सार्वभौम मराठा चक्रवर्ती राजा...
-----------------
@
मराठा चक्रवर्ती सम्राट, राजा पुलकेशी साळुंखे दुसरा या राजाने त्याच्या सार्वभौम साम्राजाच्या सीमा वाढवण्यासाठी अनेक लढाया करून त्या जिंकल्या. समुद्री भाग आणि त्याच्या सीमा स्वराज्यात असाव्यात म्हणून त्या दॄष्टीने पुलकेशीने आरमाराची बांधणी केली. पुलकेशीच्या ताब्यात कोंकण, कानडा, केरळ यांचा प्रदेश यायला वेळही लागला नाही. या सामुद्रिक बळावर त्याने मिसर, अरबस्तान, इराण आदी देशांसोबत आपले व्यापारी संबंध प्रस्थापित केले. या राजाचा ऐतिहासिक कार्यकाळ इ.सन ६०९ ते ६४२ असा राहिला.
सामुद्रिक प्रदेशावर आपली सत्ता असायला हवी, हे ओळखून मराठा चक्रवर्ती सम्राट, राजा पुलकेशी साळुंखे दुसरा या राजाने आरमारिक दलाची बांधणी हाती घेतली. ती पूर्ण झाल्यावर तो कोंकंणात शिरला. कोंकंणावर मौर्यांचे राज्य होते. मौर्याँची पुरी (दण्डापुरी) ही राजधानी समुद्रकाठी होती. पुलकेशीने तिला जमिनीवरून सैन्याकडून व समुद्रावरून नौकांकडून वेढा घातला आणि मौर्याँचा पराभव करून कोंकण प्रदेशावर आपली सत्ता प्रस्थापित केली.
मौर्याँचा पराभव करण्याअगोदर त्याने कदंबांची राजधानी वनवाशी हिजवर स्वारी करून ती जिंकली. पुलकेशीच्या आप्पायिक व गोविंद या दोन सेनापतींनी भीमेच्या उत्तरेकडील प्रदेशावर स्वारी केली. स्वतः पुलकेशी राजा देखील पराक्रमी असल्याने तो सेनापतीवर अवलंबून राहणारा नव्हता. मौर्याँचा पराभव केल्यानंतर पुलकेशीने आपल्या आरमाराच्या वाढत्या ताकदीच्या जोरावर त्याने दक्षिणेत मुसंडी मारली.
दक्षिणेत केरळ व चेर या प्रांतात शिरून तेथील राजांची त्याने मैत्री संपादली आणि त्यांना आपले मांडलिक बनवले. पल्लव राजा महेंद्र यांस उत्तर आंध्रातून पिटाळून लावले आणि त्याजपासून पिठापूर हे नगर ताब्यात घेतले. चेदी व कलिंग येथील राजेही त्यास शरण आले. उत्तर भारतातील कन्नौज येथील बलाढ्य राजा हर्षवर्धन याच्यावर पुलकेशी साळुंखे याने हल्ला चढवला. पुलकेशीने त्याचे बरेच हत्ती मारून त्याजवर विजय मिळवला.
मराठा चक्रवर्ती सम्राट, राजा पुलकेशी साळुंखे दुसरा या सार्वभौम राजाच्या साम्राजाच्या सीमा उत्तरेत नर्मदा नदीपासून दक्षिणेत केरळच्या समुद्रापर्यंत विस्तारलेल्या होत्या. पुलकेशीचे राज्य इतके विस्तार पावल्यावर त्याची कीर्ति भारताबाहेरील देशांत पसरून त्यांच्याशी त्याला राजकीय संबंध जोडण्याचीही जरूरी भासली. त्याचा वकील इराणचा राजा चोरस अर्थात खूशरू दुसरा याच्या दरबारी होता.
कोंकण, कानडा, केरळ येथील बंदरात बाहेरील देशाचे व्यापारी व त्यांची जहाजे येतं जात. त्या कारणाने त्या त्या देशातील राजांनी आपले वकील व्यापाराच्या सवलती मिळण्याकरीता पुलकेशी साळुंखे यांच्या दरबारी पाठवावे व पुलकेशीनेही आपले वकील त्यांच्या दरबारी स्वहीतरक्षणार्थ ठेवावे हें क्रमप्राप्तच समजावे लागते. या नियमाला अनुसरून इराणचा वकील पुलकेशीच्या दरबारी होता.
तो वकील पुलकेशीस इराणच्या राजाचा खलिता देत असल्याचे एक चित्र अजिंठ्याच्या पहिल्या लेण्यात कोरलेले आहे. मराठा चक्रवर्ती सम्राट, राजा पुलकेशी साळुंखे दुसरा याचे स्वराज्य नर्मदेपासून तुंगभद्रेपर्यंत आणि पश्चिमी समुद्रापासून पूर्वसमुद्रापर्यंत विस्तारलेले होते. सबंध दख्खन त्याची व त्याच्या कुलोत्पन्नान्ची होती. पुलकेशी राजाकडे प्रामाणिक, बाणेदार, आणि गर्विष्ठ सैनिकांची मोठी फलटन आहे.
राजापाशी शेकडो हजारों मल्ल आहेत. युद्धांत शरण आलेल्यास पुलकेशी अभय देणारा होता. तो अगोदर शत्रुस सावध करून मग त्यांवर सूड घेत असे. युद्धासाठी तयार ठेवलेल्या जवानास दारू पाजून बेहोश केले जात असे. त्यांनी त्या धुंदीत कोणाचा प्राण घेतला तरी त्यांना तो गुन्हा माफ आसे. लढाईत आपला सेनापती रणांगणात पाठ दाखवून परत फिरल्यावर त्याला ते लुगडे नेसविण्यास कमी करीत नाहीत.
जवानांप्रमाणेच युद्धास निघालेल्या शेकडो हत्तीस दारू पाजून धुंद ठेवण्यात येतं असे. हें हत्ती एका जमावाने शत्रूंना तुडवित जातात. आपल्या असल्या सैनिकांच्या बळावर भिस्त ठेवून राजा शत्रूला तुच्छ समजतो. पुलकेशी विषयीचे हें उद्गार चीनी प्रवाशी ह्यूएनत्संग या प्रवाशाने लिहून ठेवले आहे. अशा या पुलकेशी साळुंखे राजाने त्याच्या काराकिर्दित अग्निष्ठोम, अग्णिचयण, वाजपेय, पौण्डरिक, बहुसुवर्ण, अश्वमेध इत्यादी यज्ञ केले होते.
निम्म्याधिक भारतावर तब्बल ३४ वर्ष राजकीय आणि आर्थिक स्थैर्य देत स्थिर शासन केलेला पुलकेशी साळुंखे हा राजा राजकीय क्षेत्राप्रमाणेच सामाजिक, सांस्कृतिक अशा इत्यादि कार्यातही आपले योगदान देणारा राजा होता. त्याने त्याच्या कारकिर्दीत चुलता मंगळेश्वर (मंगळेशा) प्रमाणेच अनेक लेण्या कोरल्या, अनेक गडकिल्ल्यांची आणि मंदिराची निर्मिती केली. औरंगाबाद जवळचे वेरूळ येथील कैलाश लेणे हें राजा मंगळेश्वर (मंगळेशा) आणि राजा पुलकेशी साळुंखे या दोन्ही चुलत्या-पुतण्यांचीच तर निर्मिती आहे.
टिप :
१) पोस्टला लावलेला फोटो पुलकेशी साळुंखे राजाचा दरबार आहे.
२) हें चित्र पुलकेशीने इराणच्या राजाचा वकिलाच्या हातून खलिता स्विकारतानाचे आहे.
३) हें चित्र पुलकेशी राजाने अजंठाच्या पहिल्या लेणीत कोरलेले आहे.
@
सतीशकुमार सोळंके-देशमुख,
मुख्य आयुर्विमा सल्लागार LIC,
9422241339,
9922241339.
No comments:
Post a Comment