विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday 30 June 2021

शून्यातून स्वराज्य निर्मिती . [ भाग १ ला.]

 जगातील सर्वोत्तम राजा छत्रपती शिवराय.

-------------------------------------------

शून्यातून स्वराज्य निर्मिती .
[ भाग १ ला.]
-----------------------------
शिवरायांच्या बालपणीच्या काळात त्यांचे वडील शहाजीराजे हे निजामशाही सोडून विजापूरच्या आदिलशहाकडे सरदार म्हणून गेले होते. त्यावेळी शहाजीराजना महाराष्ट्रातील केवळ उध्वस्त अशा पुण्याची जहागिरी मिळालेली होती. आधीच मोठ्या दुष्काळाने होरपळून निघालेल्या पुण्याला मुरारजी पंडिताने जाळपोळ करून बेचिराख करून ठेवले होते. म्हणजे पुण्याच्या पांढरीवर अक्षरशः गाढवांचा नांगर फिरविला होता. शिवराय लहानपणी ह्या शहाजीराज्यांच्या पुण्याच्या जहागिरीवर देखरेख करीत होते. पुण्याच्या जहागिरीतला शेती व्यवसाय अत्यंत हलाखीचा होता. मोठ्या दुष्काळामुळे माणसे . गुरेढोरे, मेलेली होती. जी गुरेढोरे शिल्लक होती त्यांच्या चोऱ्या होत होत्या. बैल विकत घेण्यास लोकांकडे पैसे नव्हते. त्यांत पावसाची अनिश्चितता ,आर्थिक टंचाई, आर्थिक मदततिचा अभाव इत्यादी कारणामुळे शेती व्यवसाय मोडकळीस आला होता. अशा परगण्यातील पुण्याच्या जहागिरीवर देखरेख करीत होते. पुण्याच्या जहागिरीतील ३६ गावांच्या मोकाशाचा कारभार शिवराय पहात होते.
मोठ्या दुष्काळामुळे अगणितमाणसे मृत्यूमुखी पडलेली असल्यामुळे शिवरायांच्या बंडाच्या उठावासाठी पुण्याच्या परगण्यातून हवे तेवढे मनुष्यबळही उपलब्ध होण्यासारखे नव्हते, जी माणसे होती त्यांचे मनोधैर्य दुष्काळामुळे व युध्दहानीने ओढवलेल्या गरिबीमुळे खचलेले होते. म्हणजे मनुष्यबळ - सैन्यबळ याबाबतीतसुद्धा उठवासाठी शून्यताच होती.
बलाढ्य अशा मोगलशहा किंवा आदिलशहाबरोबर लढा देण्यासाठी शिवरायांना कोणाचेही पाठबळ नव्हते. निजामशाही तर बुडालेली होती , आणि टोपीकरसुद्धा शिवरायांना मदत न करता मोगलशहा व आदिलशहाला मदत करीत होते. महाराष्ट्रातील जहागीरदार व वतनदार यांचासुद्धा शिवरायांकडे पाहण्याचा दृष्टीकोन केवळ एक जहागीरदराचा मुलगा म्हणून होता. शिवरायांकडे भोवतालच्या सत्ताधीशांच्या पाठबळाचाही अभाव होता.
शिवरायाना धीरोदत्त पाठींबा होता तो माता जिजाऊ व पिता शहाजीराजे यांचा. त्यातल्या त्यांत शहाजीराजांचा जो पाठींबा होता त्या पाठिंब्याच्या जोरावर शिवरायाना शत्रूबरोबर लढण्याची प्रेरणा व शक्ती मिळालेली होती.
पण तसे पाहता शिवरायासमोर एकूणच शून्यवत स्थिती होती आणि या स्थितीतून शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती करण्यास सुरुवात केली होती. शिवराय आपल्या बाल सवंगडी यांचे बरोबर बारा मावळात हिंडु फिरू लागले. तिथे त्यांना जिवलगमित्र मिळत होते. ते आपल्या सवंगडीबरोबर सह्याद्रीच्या दर्याखोर्यात ,डोंगरदर्यात ,कडे-कपाऱ्यात फिरून त्यांची माहिती करून घेत होते. [अपूर्ण.]

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...