अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील जवळा या गावात जहागीरदार सोमवंशी घराण्याची गढी आहे. जवळा हे गाव पारनेरपासून २० कि.मी अंतरावर आहे आणि निघोजपासून ८ कि.मी अंतरावर आहे. गढीचे भक्कम प्रवेशद्वार स्वागत करते. गढीचे भव्य बुरूज आजही सुस्थितीत आहेत बुरूज साधारणतः ३० ते ४० फुट उंचीचे आहेत. गढीचे बांधकाम १८ व्या शतकापूर्वी करण्यात आले. बाजूची तटबंदी काही प्रमाणात ढासळलेली आहे. गढीला १० बुरूज आहेत असे लक्षात येते. आतमध्ये नवीन पद्धतीची जहागीरदार सोमवंशी घराण्यातील वंशजांची घरे आहेत.घरातील देवघर खूप छान आहे.आतमध्ये तटबंदी आणि बुरूजावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. आत काही ठिकाणी तटबंदीचे वरील दगड ढासळले आहेत आतील भाग शिल्लक आहेत. तटबंदीवरून सर्व गावाचे दर्शन होते.
बाजीराव पेशवे यांचा उत्तरेकडील मोहीमेत या सोमवंशी घराण्याशी सबंध आला. सोमवंशी घराण्यातील दावलजी सोमवंशी यांनी बाजीराव पेशवे यांना अत्यंत महत्वाच्या अशा पालखेडच्या लढाईत साथ दिली. ही लढाई बाजीरावांच्या युध्दकौशल्याची परिपूर्णता दाखविणारी होती. यात अनेकांनी योगदान दिले. पण दावलजी सोमवंशी यांचे शौर्य हे महत्वाचे होते.
सोमवंशी घराण्यातील एक शाखा जवळा या गावात आली. दामाजीराव हे या शाखेचे मूळपुरूष होते.सोमवंशी जहागीरदार यांनी इ.स. १८५७ साली चांगली कामगिरी केली. पद्माजीराव सोमवंशी यांना इ.स. १८५७ च्या उठावानंतर दोन वर्षांनी इ.स. ३१ जानेवारी १८५९ साली इनाम म्हणून जहागिरी मिळाली. पुणे व अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर हे गाव असल्याने राज्य कारभाराच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र म्हणूनच जवळे हे गाव पाहिले जायचे.
टीम - पुढची मोहीम
























No comments:
Post a Comment