सरदार पांढरे गढी - गांजीभोयरे
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील गांजीभोयरे गावात सरदार पांढरे घराण्याची गढी होती. गांजीभोयरे हे गाव पुणे-नगर महामार्गावरील शिरूरपासून २३ कि.मी, पारनेर या तालुक्याच्या गावापासून १२ कि.मी आणि निघोजपासून १५ कि.मी अंतरावर आहे. सद्यस्थितीत गावात गढीचे भव्य बुरूज आणि प्रवेशद्वार शिल्लक आहे. सर्व तटबंदी आणि आतील भाग नामशेष झालेला आहे. जवळच पुरातन वाड्याचे अवशेष आहेत. गढीसमोर दर्गा आहे. गावात जवळच डोंगरावर मंदिर आहे ते पहाण्यासारखे आहे.
निजामशाहीच्या काळात गढीचे बांधकाम झाले असावे. इ.स. १६०९ च्या आसपास सदर गढीचे बांधकाम झाले असावे असा अंदाज आहे. गांजीभोयरे गावाला निजामशाही, पेशवे ते इंग्रज राजवटीत मोठे स्थान मिळाले. गांजीभोयरे हे गाव त्या काळी तहसील म्हणून कार्यरत असल्याचे इतिहासात दाखले आहेत. गांजीभोयरे गावात त्या काळची सर्वांत मोठी दैनंदिन गरजेच्या व इतर वस्तूंच्या खरेदी-विक्रीची ‘बाजारआळी’ होती. गांजीभोयरे गावातील पांढरे सरदारांना आपल्या पराक्रमाच्या जोरावर जहागीर म्हणून ही गढी व गावाची सुभेदारी मिळाली होती. पांढरे सरदार हे मूळचे सातार्याचे असल्याचे त्यांचे वंशज सांगतात.
सरदार पांढरे यांचे मूळ वतन वावरहिरे होते. ते माण तालुका मधील शिखर शिंगणापूर येथे आहे. विजापूरच्या मातब्बर मंडळी मध्ये यांचे नाव प्रथम होते. पुढे शिव काळात ते मराठा साम्राज्याचे पराक्रमी एकनिष्ठ सरदार बनून राहिले. यांना इंदोर, बडोदा येथे हजारो एकर जमीन आजही आहेत. एका आदिलशाही पत्रात यांचा उल्लेख नाईक निंबाळकर, कोकरे, बर्गे, जगदाळे, निकम पिसाळ, फडतरे, गाढवे या सरदार मंडळी सोबत दख्खन मधील सरदार म्हणुन नमूद आहे.
टीम - पुढची मोहीम
No comments:
Post a Comment