विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 14 June 2021

मुस्लिम व मराठेशाहीतही तळपत होती 👇👇👇 राजे साळुंखे वंशजांची पराक्रमी मनगटे

 


मुस्लिम व मराठेशाहीतही तळपत होती

👇👇👇
राजे साळुंखे वंशजांची पराक्रमी मनगटे
-------------------
@..............✍️
सतीशकुमार सोळंके-देशमुख
सार्वभौम चक्रवर्ती सम्राट दख्खनाधिपथेश्वर राजे साळुंखे चाळुक्य राजवंश दक्षिण भारतातील एक महाशक्तिशाली उच्चकुलीन राजवंश असून या राजवंशाने दख्खनात आपल्या प्रजेवर प्रेम करत शेकडो वर्ष धर्मराज्य केल्याचा इतिहास आहे. राजे साळुंखे चाळुक्यांच्या बदामी, वेंगी, गुजरात, उत्तरकालीन कल्याण या मोठ्या राजवटीतील आणि इतर शेकडो छोट्या राजवटीतील वंशजांनी नंतरच्या मुस्लिम, मराठेशाही आणि पेशवाईतील काळात अनेक पराक्रमी इतिहास रचले. या पराक्रमी इतिहासाच्या अनेक साक्ष आज देखील या वंशजांकडे अस्तित्व रूपाने जिवंत असल्या तरी तात्कालीन काळात दुर्दैवाने हा पराक्रमी इतिहास सूत्रबद्ध लिहून ठेवणाऱ्या दर्जेदार इतिहास लेखकांची पोकळी निर्माण झाल्याने मराठेशाहीचा हा दर्जेदार पराक्रमी इतिहास लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघात गडप झाला आहे.
मुस्लिमशाही आणि मराठेशाहीतील मिळालेल्या पदव्यांनी कुळाची आडनावे सजवायची असतील, तर या अशा पदव्या कुळाच्या आडनावाकडे तेवढ्या मुबलक स्वरूपात असणे गरजेचे आहे. मराठ्यातील बहुतांश कुळाकडे नाममात्र पदव्या असतीलही मात्र त्या साळुंखे चाळुक्य राजवंशातून नंतरच्या काळात सरदार घराण्यात कन्व्हर्ट झालेल्या लढवय्या वंशजांनी रणात लढून पराक्रमाच्या जोरावर मिळविलेल्या पदव्या (किताब) एवढ्या निश्चितच नसतील, हे आम्ही येथे छातीठोकपणे आणि मोठ्या अभिमानाने सांगू शकतो. एक दोन नव्हे, तर साळुंखे घराण्यातील लढवय्या वंशजांनी त्यांच्या पराक्रमी मनगटाच्या जोरावर तब्बल सव्वाशेहून अधिकच्या पदव्या मिळविलेल्या आहेत, हे घराण्यातील पदव्यांच्या पडनावाने राहणाऱ्या वंशजांचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येते.
हे मुद्दामहून येथे सांगण्याचे कारण एवढेच, की परवा एकजन भेटला होता. म्हणाला, "मी तुमच्या सर्व पोस्ट वाचतो, त्यावरून एक समजले की बाराव्या-तेराव्या शतकाअगोदर साळुंखे आडनावाचा मोठा इतिहास आहे; पण त्यानंतर म्हणजे, मुस्लिम काळ, शिवकाळ, पेशवाई आदी काळात साळुंखे घराण्याचा इतिहास नव्हता का?" मग मी त्याला सांगितले बाबा रे, साळुंखे घराण्याला मुस्लिमकाळ, शिवकाळ, पेशवाई आदी काळात इतिहास नसता, तर मग रणातील पराक्रमातून निर्माण झालेल्या तब्बल सव्वाशेहून अधिकच्या पदव्या साळुंखे कुळाकडे कशा आणि कुठून आल्या असत्या? एवढ्या सगळ्या पदव्या अजून दुसऱ्या कोणत्या एखाद्या मराठा कुळाकडे तुम्ही पाहिल्या आहेत का? असतील तर सांगा? जर साळुंखे घराण्यातील पराक्रमी वंशजांनी रणांगने गाजवली नसतील तर त्यांच्याकडे एवढ्या पदव्या कुठून आल्या? असा माझा त्याच्यासाठीचा आपसूकच सवाल होता.
तद्नंतर मी त्याला साळुंखे राजवंशातील वंशजांनी रणात शौर्य गाजवून पराक्रमी मनगटाच्या जोरावर मिळविलेल्या पदव्या आणि त्यांचे अर्थ समजावून सांगितले, त्यावेळी तो देखील अवाक झाला. उदाहरणासाठी यातील काही पदव्यांची पडनावे सांगायची झाली, तर साळुंखे राजवंशातील एक सामान्य भासणारे 'वाबळे' हे साळुंखे कुळातील एक प्रतिष्ठित पडनाव आहे त्याचे उदाहरण घेऊ. वाबळे या पडनावाकडे बघितल्यावर हे पडनाव अगदीच सामान्य वाटते. त्यात काय पराक्रमी अर्थ दडलाय, हे कोणाच्याही लक्षात येत नाही. आता आपण 'वाबळे' या आडनावात काय पराक्रमी अर्थ दडला आहे ते बघू , वाबळे हे पडनाव निर्माण, "वाबळे = वाह + बळे = वाबळे" म्हणजे याचा सरळ अर्थ घेतला तर ''साळुंखेतील ज्या लोकांच्या बळाची रणात 'वाह' 'बळे' म्हणून तारीफ व्हायची ते वाबळे. अवघडराव हे अजून एक या कुळातील पडनाव, अवघड कामगिरी घेऊन त्या सहज फत्ते करण्याची साक्ष पटवून जाते.
शिरखैरे ही अजून एक पदवी. "शिरखैरे म्हणजे रणात ज्या पराक्रमी सरदारांच्या तलवारी शिरावर चालायच्या आणि एका घावात शिर कटायचे.''धडलग या रणातील पदवीचा अर्थ म्हणजे 'रणात तलवारी चालून एका घावात शत्रूचे शरीर धडावेगळें करणारे.' घनघावे म्हणजे 'रणात ज्यांचे घाव घनासारखे पडायचे, असे साळुंखेतील लोक.' आता फडतरे या पडनावाचा अर्थ पाहू, 'फडतरे म्हणजे, फड (युद्धाचे मैदान) आणि त्याला तारण्याची ताकत ठेवून असलेले साळुंखेतील लोक.' रणखांबे हे अजून एक साळुंखेतील पडनाव. याचा अर्थ म्हणजे, रणात खांबासारखे पाय रोऊन उभे राहणारे साळुंखेतील लोक.' या ठिकाणी सर्वच पदव्यांचे अर्थ सांगत बसलो तर लेख खूप मोठा होईल म्हणून या सर्व पदव्यांवरील भाष्य आम्ही आमच्या आगामी येणाऱ्या पुस्तकातून करणारच आहोत.
जर साळुंखे घराण्याला मुस्लिम आणि मराठेशाहीच्या पुढील इतर काळात इतिहास नसता, तर मग रणातील पराक्रमी इतिहास घडवणाऱ्या इतक्या पदव्या त्यांच्याकडे कुठून व कशाच आल्या असत्या? साळुंखेंना पराक्रम शिकवावा लागत नाही, तो पराक्रम त्यांच्यात पूर्वजांच्या अनुवंश संक्रमणातून आपोआपच आलेला आहे. त्यांचा पराक्रम कोणी लिहून जरी ठेवला नसला, तरी हा गुण त्यांच्यात उपजतच आहे. मुस्लिम आणि शिवकाळात देखील साळुंखेंची शेकडोंनी सरदार घराणी इतिहास गाजवत होती, मात्र हा पराक्रमी इतिहास लिहून ठेवतील तेवढ्या तोडीचे इतिहासकार तरी भारतात कुठे होते? शिवभारतात कवी परमानंद याने प्रतापगड रणसंग्रामात सरदार कमळोजी साळुंखे यांचे आणि शिरवळ तसेच पुरंदर पायथ्याच्या बेलसर लढाईतील तिन्ही चोर साळुंखे भावांचा पराक्रमी इतिहास नोंदवला नुसता, तर या वीरांचे नाव आणि त्यांचा पराक्रमी इतिहास कोणाला माहिती झाला असता? कमळोजी साळुंखे आणि सेनानायक भिकाजी, तुकोजी व भैरव चोर साळुंखे यांचा पराक्रमच काय, तर कमळोजी आणि या तिन्ही पराक्रमी चोर साळुंखे बंधूंचा इतिहास तरी जगाला माहीती झाला असता काय?
सरदार कमळोजीने प्रतापगड रणसंग्रामात एवढा भीमपराक्रम गाजवीलेला असताना त्यावेळच्या इतर समकालीन साधनांनी त्या त्यांच्या साधनातून स्वत:च्या पाठी थोपटावीत असताना कमळोजीचे नाव अथवा त्याच्या पराक्रमी इतिहासाला मांडण्याचे औदार्य का दाखवीले नाही? तसेच शिवरायांचे पहिले सेनानायक भिकाजी चोर साळुंखे, भैरव चोर साळुंखे, तुकोजी चोर साळुंखे यांचा बेलसर आणि शिरवळ येथील युद्धाचा पराक्रमी इतिहास कवी परमानंद याने मांडला नसता तर तो तरी समजला असता का? यावरून तसे औदार्यच त्या काळातील त्या इतिहासकारात नव्हते, हेच यातून सिद्ध होत नाही का? सरदार तुकोजी चोर-साळुंखे आणि त्याचे दोन भाऊ भिकाजी आणि भैरव या तीन्हीं भावांनी शिवाजी राजांनी जमिनीवर लढलेल्या बेलसर येथील पहिल्या लढाईत पराक्रम दाखविला होता आणि फतेखानाचा धुव्वा उडविला होता. या लढाईत भिकाजी हा सेनानायक म्हणून लढला होता. हा इतिहास आज तरी इतिहासाचे अस्सल साधन असलेले शिवभारत सोडून दुसरीकडे कुठे मांडला जातोय.
टिप :
साळुंखे/सोळंके/चाळुक्य या मूळ फॅक्टरीच्या आडनावाने राहाणाऱ्या वंशजांनी आणि या वंशाचा वारसा सांगणाऱ्या पण पडनावाने राहाणाऱ्या सगळ्या रॉयल वंशज फॅमिली आपल्या आडनावापुढे साळुंखे कुळातील 'राजे, सरकार, मिरासदार, जहागिरदार, देशमुख, इनामदार, सरंजामदार' 'राव साळुंखे' या तसेच आपल्या पूर्वजांनी मनगटी पराक्रमाच्या जोरावर मिळवलेल्या रणातील सर्व सव्वाशेहून अधिकच्या पदव्यातील कुठली देखील पदवी ते आपल्या आडनावासमोर लावू शकतात.
( अपूर्ण )
मार्गदर्शक :
------------
प्रा. डॉ. नीरज साळुंखे सर,
असोसिएट प्रोफेसर,
पी.एचडी गाईड,
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा यूनिवर्सिटी औरंगाबाद.
@
सतीशकुमार सोळंके-देशमुख,
👉मुख्य आयुर्विमा सल्लागार LIC,
👉ऑल इंडिया चेअरमन्स क्लब मेंबर
👉एम.डी.आर.टी. यू.एस.ए.
👉"अग्निवंश",
सिद्धीविनायक कॉलोनी गेवराई,
ता. गेवराई, जि. बीड
👉9422241339,
👉9922241339.

No comments:

Post a Comment

राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला 🚩 भाग 9

  राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला भाग 9 लखुजीराजे जाधवरावांची हत्या भातवडीच्या युद्धानंतर मलिक ...