राजे साळुंखे (सोळंके) चाळुक्यांचे



प्रभावी प्रतीहार(दूत) व गुप्तहेरखाते
------------------
@........................

सतीशकुमार सोळंके-देशमुख
सार्वभौम चक्रवर्ती सम्राट दख्खनाधिपथेश्वर राजे साळुंखे चाळुक्यांच्या पदरी प्रतीहार(दूत) आणि गुप्तहेर संख्या व यंत्रणा मोठी प्रभावी असल्याचे लक्षात येते; राजे साळुंखे चाळुक्यांच्या अभिलेखातून यासंदर्भात वर्णन येते. या वर्णनातून त्यावेळच्या प्रतीहार आणि गुप्तहेर यंत्रणेचे प्रभावी चित्रण नजरेसमोर उभे राहण्यास मदत होते.
---------
श्लोक :
---------
भक्तो गुणी सुचिर्दक्ष: प्रगल्भो व्यसनी क्षमी।
ब्राह्मण: परमर्मज्ञो दूत: स्यात्प्रतिभानवान्॥
---------
या अभिलेखातून राजे साळुंखे चाळुक्यांनी दुताचे अंगी असाव्या लागणाऱ्या गुणांचे पूरक वर्णन केलेले दिसून येते. दूत आणि हेरांना शस्त्रांचे भय नव्हते, कारण हे लोक संदेश पोहोचविण्यासाठी अवध्य होते. ते राजांचे परम हितैषी होते. साळुंखे राजांच्या अभिलेखातील या वर्णनाला अभ्यासल्यानंतर राजे साळुंखे चाळुक्यांच्या पदरी असलेले प्रतीहार व गुप्तहेरखाते मोठे प्रभावी असल्याची बाब लक्षात येते.
सार्वभौम चक्रवर्ती सम्राट दख्खनाधिपथेश्वर राजे साळुंखे चाळुक्यांच्या काळात प्रतीहार आणि हेरखाते प्रभावी असल्याचे त्यांच्या अभिलेखातून लक्षात येते. मुस्लिम पूर्व काळात राजे साळुंखे चाळुक्यांच्या दक्षिण भारतात विखुरलेल्या महाकाय सार्वभौम साम्राज्याच्या पदरी प्रभावी दूत आणि हेर होते, याची या वर्षातील वंशजांना पण कल्पना नसावी हे ऐतिहासिक दुर्दैवच म्हणावे वाटते.
राजे साळुंखे चाळुक्यांच्या अभिलेखातून समोर येणारी बाब म्हणजे राजाला उन्नत, रूपवान, दक्ष, मधुभाषी, पराक्रमी, गर्वरहित सगळ्यांची मने जिंकणारा असा व्यक्ती प्रतिहार म्हणून हवा असतो. अशा व्यक्तीला प्रतिहार म्हणून नियुक्त करण्याचा सल्ला साळुंखे चाळुक्य राजांनी दिला आहे. प्रतिहार(दूत) आणि हेर हे राजासाठीचे परमप्रिय दूत होते. प्रतिहारांना राजनीति मध्ये प्राचीन काळापासून अनन्यसाधारण श्रेष्ठ स्थान प्राप्त झालेले होते हेच यावरून लक्षात येते. प्रतिहार आणि हेर हे शस्त्रास्त्रामध्ये पारंगत झालेले असत. त्यांच्यात आळशीपणा अजिबात नसे, जे सदैव नम्र असत. प्रतिहार हे उच्चकुलीन असले पाहिजेत असे चाळुक्य राजांचे मत होते. त्यामुळेच त्यांच्या अभिलेखातून त्यांनी 'उन्नत' या शब्दाचा प्रयोग केला आहे.
दूत हा प्रगल्भ निर्व्यसनी, बुद्धिमान, दक्ष सगळ्या भाषेतील निपून, संधीविग्रह तत्वाला जाणारा, सर्व लिपी आणि अक्षरे वाचणारा, शत्रूच्या मर्माला ओळखणारा असला पाहिजे असेही या राजांचे मत होते. प्रतिहार आणि गुप्तचर हे दर्पवर्जित, दक्ष, प्रियवान असावेत, तसेच हे दोन्हीही लोक राजाचे डोळे असतात (चारै: पश्यन्ति राजान:) असे चाळुक्य राजाचे मत होते. प्रतिहार आणि हेर यांच्यात असे गुण असतील तरच राजा विजयी होऊ शकतो असे साळुंखे चाळुक्य राजांचे मत दिसते.
( अपूर्ण )
मार्गदर्शक :
------------
प्रा. डॉ. नीरज साळुंखे सर,
असोसिएट प्रोफेसर,
पी.एचडी गाईड,
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा यूनिवर्सिटी औरंगाबाद.
@
सतीशकुमार सोळंके-देशमुख,




सिद्धीविनायक कॉलोनी गेवराई,
ता. गेवराई, जि. बीड


No comments:
Post a Comment