मराठा स्वराज्य मग ते शिवकालातील असो किवा पेशवेकाळातील असो किवा होळकर काळातील असो त्या वीरांचा इतिहास .जे मराठा स्वराज्यासाठी लढले त्या मराठा वीरांचा इतिहास
विनोद जाधव एक संग्राहक
Friday, 9 July 2021
#शेतकरी_हा_राज्याचा_अन्नदाता_आहे
#शेतकरी_हा_राज्याचा_अन्नदाता_आहे, असा विचार #छत्रपती_शिवाजी_महाराजांनी_रयतेला_दिला. छत्रपतींच्या सैन्यात सर्वाधिक शेतकर्यांची मुले होती, हे जाणूनच शेतकर्यांचे हित जपणे हे ते आद्यकर्तव्य मानत. शेतकर्यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने शिवरायांनी सर्वाधिक उत्पन्न काढणार्या शेतकर्यांना #पुरस्कार_देऊन_गौरवित_असत.अल्पभूधारक व कमी उत्पन्न असणार्या शेतकर्यांना शिवकाळात मोफत बी-बीयाणेपुरविली जायची. याशिवाय शेतीमालाला योग्य किंमत देऊन शेतसाराही किफायतशीर प्रमाणात आकारला जात असे. पडिक जमिनीची मशागत करणार्या शेतकर्यांना राज्याकडून अर्थपुरवठा केला जात असे दलालांची प्रथा तर छत्रपतींनी पुर्णत: नष्ट केली होती. बहुजन समाजातील लायक व्यक्तिंना महसूल अधिकारी म्हणून नेमण्याची पद्धत छत्रपति शिवरायांच्या कारकिर्दीतच सुरु झाली. #दुष्काळाच्या_काळात_शिवकाळात_शेतकऱ्यांना_शेतसारा_माफ_करुन_त्यांच्या_गुरांसाठी_मोफत_चारा_पुरविलाजातअसे. शेतकर्यांच्या भाजीच्या देठालाही हात लाऊ नये, मोबदला दिल्यशिवाय फळे घेऊ नका, झाडे तोडू नका, असे कडक फर्मान छत्रपतींनी महसूल अधिकार्यांना काढले होते. #शेतकऱ्यांची_आर्थिक_स्थिती_सुधारली_तर_देशाला_संपन्नता_येईल, असे मत महाराजेंचं होतं.
Subscribe to:
Post Comments (Atom)
! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!
! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...

-
25 सप्टेंबर 1750 रोजी नानासाहेब पेशवे व राजाराम महाराज द्वितीय यांच्यात सांगोला करार झाला सांगोला करार :- छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थाप...
-
११ माशी अक्करमाशी असा उल्लेख असा येतो. आपण प्राचीन क्षत्रियांचे वंशज आहों असें मराठे म्हणतात. प्रचारांतल्या त्यांच्या आडनांवा...
-
महत्वकांक्षी महाराणी बाकाबाई ( डोंगरक्वीन ) श्रीमंत महाराणी बाकाबाई भोसले (१७७४-१८५८) या दुसरे राजे रघुजी भोसले यांच्या चौथ्या आणि आवडत्या...
No comments:
Post a Comment