इस ७४२ मध्ये दंतीदुर्ग या राष्ट्रकूट(हा पुढे चाळुक्यांची सत्ता संपवून सम्राट झाला, तेव्हा तो सामंत होता, ) सामंताने वेरूळच्या "गुहेश्वरतीर्थात"(म्हणजे पवित्र कुंडात) स्नान करून ब्राह्मणास दान दिले.
आता याचा अर्थ त्यावेळी वेरूळच्या प्रसिद्ध कुंडाचे अस्तित्व त्या आधीपासून होते,
हे " गुहेश्वरतीर्थ" कुंड म्हणजे पुष्करणी म्हणजे आज जिला सीता की न्हाणी म्हटलं जाते ते काही अभ्यासक म्हणतात, पण ते वेरूळचे प्रसिद्ध कुंड एव्हडा उल्लेख महत्त्वाचा आहे.
एकूण वेरूळच्या पुष्करणी चा इतिहास किमान सुमारे १२६० वर्षे जुना आहे एव्हडे तरी म्हणता येते,
हे गुहेश्वर म्हणून नोंदविलेले शिवमंदिर कदाचित घृष्णेश्वर असावं असे काही अभ्यासक मांडतात.
No comments:
Post a Comment