विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 19 August 2021

राजे साळुंखे चाळुक्यांनी नांदेड येथे 👇👇👇 बांधलेल्या शाळा आणि देवळांना वाघी गावाचे दान!

 


राजे साळुंखे चाळुक्यांनी नांदेड येथे
👇👇👇
बांधलेल्या शाळा आणि देवळांना वाघी गावाचे दान!
-------------------
-------------------
सतीशकुमार सोळंके-देशमुख
@..............✍️
नांदीतट अर्थात आजच्या नांदेड येथील राजे साळुंखे चाळुक्यांनी बांधलेल्या शाळा आणि देवळांना वार्षिक खर्चासाठी त्यांनी गोदावरी काठावरील वाघी या गावाचे दान दिले होते. साळुंखे चाळुक्य नरेश षष्ठ विक्रमादित्य याचा सेनापती भीमदेवाने नांदेड येथील शाळा आणि देवळांचे निर्माण करण्याचे धर्मकार्य केले होते आणि शाळा आणि देवळाच्या वार्षिक खर्चासाठी त्याने नांदेड जवळील वाघी या गावाचे दान दिले होते.
----------------
श्लोक :
----------
गोदावरीसलिलधौतमहाघसंघे नांददीतटे त्रिपुरुषै: कृतसुप्रतिष्ठां।
पवनभीमसमाख्यशालां ग्रामं ददौ विपुलवैभववग्धिकाख्यम्॥
----------------
सार्वभौम चक्रवर्ती सम्राट दख्खनाधिपथेश्वर राजे साळुंखे चाळुक्यांच्या अभिलेखातून वरील प्रमाणे माहिती आली आहे. त्यावेळच्या 'नांदीतट' अर्थात आजच्या नांदेड शहरात साळुंखे राजांनी शिक्षणाचे आणि धर्मकार्यात अडचणी येऊ नयेत म्हणून शाळा आणि देवळाची निर्मिती केली होती. नांदेड हे शहर गोदावरीच्या काठावर वसलेले शहर असून पूर्वी या शहराला 'नांदीतट' अशा नावाने ओळखले जात होते.
राजे साळुंखे चाळुक्यांच्या अभिलेखात आलेला वरील श्लोक 'नांदीतट' अर्थात आजच्या नांदेड शहरात बाराव्या शतकाच्या प्रारंभी शाळा आणि देवळाची निर्मिती केल्याच्या संदर्भातील असून ज्याच्या वार्षिक खर्चासाठी नांदेड परिसरातील वाघी गावाला दान दिल्याच्या संदर्भातील आहे.
भारतीय शास्त्र आणि पुराणातून गोदावरी नदीला दक्षिण गंगा असे संबोधन होताना दिसते. जिच्या पाण्याने महापापांचे समूह धुऊन निघतात, त्या गोदावरी नदीच्या काठावरील 'नांदीतट' गाव म्हणजे आजचे नांदेड हे शहर होय; जे शहर महाराष्ट्रातील आज एक जिल्ह्याचे ठिकाण तसेच महानगरपालिका असलेले एक राज्यातील मोठे शहर म्हणून नामांकित आहे.
उत्तरकालीन कल्याणच्या राजे साळुंखे चाळुक्यांच्या काळात नांदेड या शहराचे नाव 'नांदीतट' हे होते. नांदेडचा 'नांदीतट' या नावाने उल्लेख दहाव्या शतकातील नांदेड जिल्ह्यातील सापडलेल्या राष्ट्रकूटांच्या शिलालेखात देखील आढळतो. 'नांदीतट माहात्म्य' नावाचा ग्रंथ असून या ग्रंथात तर अनेक ठिकाणी नांदेड शहराचा उल्लेख नांदीतट असाच केलेला आढळतो.
चौथ्या शतकातील वाकाटक वंशातील द्वितीय विंध्यशक्तीच्या वाशिम ताम्रपटातील 'नांदीकड' असा उल्लेख देखील याच नांदेड शहरासाठीचा असावा. 'नांदीकट' हे 'नांदीतट' या शब्दाचे प्राकृत रूपांतर होय. या सर्व गोष्टींना पाहिल्यानंतर आजचे नांदेड शहर पूर्वी 'नांदीतट' या नावाने तर त्यापूर्वीच्याही काळात 'नांदीकट' अथवा 'नांदीकड' या नावाने ओळखले जात असावे हे स्पष्ट अर्थाने दिसून येते.
राजे साळुंखे चाळुक्यांचा सेनापती असलेल्या भीमदेवाने 'नांदीतट' येथील बांधलेल्या देवळांना व येथील शाळांना त्याने वग्घि नावाचे गाव म्हणजे आजचे 'वाघी' नावाचे खेडे खर्चासाठी दान दिले होते. वाघी हे गाव नांदेड पासून पश्चिमेकडे सहा किलोमीटर अंतरावर गोदावरी नदीच्या काठावरच स्थित आहे.
टीप :
फोटो नांदेड जिल्ह्यातील होट्टल, ता. देगलूर येथील राजे साळुंखे चाळुक्यांच्या निर्मितीतील सिद्धेश्वर महादेव मंदिराचा आहे.
मार्गदर्शक :
------------
डॉ. नीरज साळुंखे,
असोसिएट प्रोफेसर,
पीएचडी गाईड,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा यूनिवर्सिटी औरंगाबाद.
------------
@
सतीशकुमार सोळंके-देशमुख,
👉मुख्य आयुर्विमा सल्लागार LIC,
👉ऑल इंडिया चेअरमन्स क्लब मेंबर
👉एम.डी.आर.टी. यू.एस.ए.
👉"अग्निवंश",
सिद्धीविनायक कॉलोनी गेवराई,
ता. गेवराई, जि. बीड
👉9422241339,
👉9922241339

No comments:

Post a Comment

राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला 🚩 भाग 9

  राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला भाग 9 लखुजीराजे जाधवरावांची हत्या भातवडीच्या युद्धानंतर मलिक ...