विनोद जाधव एक संग्राहक

Friday 20 August 2021

चाफेकरबंधूचा पराक्रम!

 


चाफेकरबंधूचा पराक्रम!

रँडचा वध व चाफेकरबंधू.......

22 जून रोजी चाफेकरबंधूनी रँडचा वध केला.



                 आज संपूर्ण  जगात कोरोना रोगाची साथ पसरली असून त्यावर योग्य  औषधउपचार नसल्याने त्याबाबत भीती आहे. अगदी अशीच भीती १८९७ मध्ये प्लेग हा रोगाची होती.  पुण्यात प्लेगची साथ उसळली . ती वेगाने पसरत गेली. घराघरातून माणसांचे बळी गेले. या साथीला प्रतिबंध  करण्याचे प्रयत्न  सर्व पातळीवर सुरु झाले. प्लेगप्रतिबंधक लस उपलब्ध नसल्याने  प्लेग होणे म्हणजे  मरणाच्या दारात दाखल होणे असे मानले जाऊ लागले . पण तो पसरु नये म्हणून  अनेक उपाय अवलंबिले जात होते. प्लेगग्रस्तांना क्वारंटाईन करण्यात  येत असे. ब्रिटिश  सरकारने क्वारंटाईन क्षेत्र  निर्माण केले खरे ,पण तिथे खाण्यापिण्याची व्यवस्था ठेवल्या नाही.परिणामी जो रुग्ण प्लेगने जाणार होता तो उपासमारीनेच मरु लागला. प्लेगग्रस्ताना कोणी अन्नाची मदत केली तर त्यालाही या क्वारंटाईन सेंटरमध्ये  जबरदस्तीने दाखल करण्यात येत असे. तसेच  प्लेगचा रुग्ण शोध कार्यासाठी पुण्याचे प्लेग अधिकारी वॉल्टर चार्ल्स रँड यांनी एक लष्कराची तुकडी तैनात केली होती. पेठापेठांची आणि  घराघरांची झडती सुरु झाली. सभ्यता  आणि  संस्कृती  याचा संदर्भ  विसरुन सैनिकांचा स्वैरविहार सुरु झाला. भर रस्त्यात स्त्रियांना  थांबवून काखेतील गाठी पाहण्याचा कार्यक्रम  सुरु झाला. या विरोधात लोकमान्य टिळकांनी   " रोगापेक्षा  औषध जालीम " असा अग्रलेख केसरीत लिहून ब्रिटिश  सरकारला समज दिली. पण धटिंगणांना याचे सोयरसुतक नव्हते . ही स्थिती पाहून पुण्यातील  दामोदर , वासुदेव व बाळकृष्ण चाफेकर यांचे रक्त उसळून आले. ब्रिटिश  लष्कर  कधीही घरी येत असे. घरातील लोकांना  बाहेर काढून निर्लज्जपणे प्लेगचा रुग्ण  शोधत असे. गप्प बसणे , सहन करणे , देवाला साकडे घालणे , नशिबाला दोष देणे , प्रारब्धाचा भाग म्हणून  स्वीकार करणे. हा चाफेकर बंधूना मूर्तिमंत भेकडपणा वाटत होता. पुण्यात रँडसारखे अधिकारी  लोकांचा छळ करतात , लोकमान्य टिळकांनी  व्हाइसरॉयला पत्र लिहिले. मात्र  ब्रिटिशांनी  त्या पत्राला केराची टोपलीत टाकले. या सर्व परिस्थितीचा विचार करुन या रँडची खोड मोडायचीच हा निर्धार चाफेकर बंधूनी केला.२२ जून १८९७ इंग्लंडची राणी व्हिक्टोरियाच्या राजवटीला पंचवीस वर्ष पूर्ण झाले. तिच्या रौप्य महोत्सव  २२जून १८९७ या दिवशी पुणे येथील  गणेशखिंडीजवळ गव्हर्नरच्या निवासस्थानी  टोलेजंग मेजवाणीचा बेत होता. हा समय चाफेकरबंधूना अनुकूल वाटला. त्यांनी योजना आखली.  ब्रिटिश  अधिकारी उघड्या  घोडागाडीतून रमतगमत , लोकांना  हिणवत जात असे. २२जूनच्या रात्री  मेजवानी आटोपल्यावर  रँडसाहेब विशिष्ट  वाटेने जाणार होता. त्यांची गाडी ओळखू यावी म्हणून  तिच्या मागोमाग "गोविंदा आला रे " ही घोषणा देत वासुदेव चाफेकर धावणार होते.चाफेकर बंधूनी पिस्तुल मिळवली. रात्रीची वेळ होती. चाफेकरबंधू ठरल्याप्रमाणे आपआपली जागेवर रँडची वाट पाहत होते. भोजने उरकली . मैफल संपली. आधिका-यांच्या गाड्या निघाल्या.पहिल्यांदा पुढे आलेली आणि  टिपलेली गाडी निघाली लेफ्टनंट आर्यस्ट यांची , बाळकृष्ण चाफेकर गाडीवर चढले . त्याने आपले पिस्तूल चालवले. आर्यस्टचा वध झाला.मात्र चाफेकरबंधूना हवा असणारा हवा असणारा रँड मागेच राहिला होता.काही क्षणांतच वासुदेव चाफेकराची हाळी ऐकू आली. लगेच दामोदर चाफेकर चित्यासारखा झेपावला. निमिषार्धात रँड गतप्राण झाला. हे सर्व घडताच  चाफेकरबंधू शांत चित्ताने एका पायवाटेने चालत होते.  हा दिवस होता २२ जून १८९७ चा प्लेगच्या नावाने सर्वसामान्य  लोकांचा ब्रिटिश  शासनाने जो छळ मांडला होता त्याला दिलेले हे सणसणीत उत्तर होते. काही दिवसांत  चाफेकरबंधूना फासावर चढवण्यात आले.  बुद्धिवंत म्हणतात की , काही ब्रिटिश  अधिकाऱ्यांचा वध करुन स्वातंत्र्य  मिळत नाही. मात्र निर्माल्यावस्थेत निपजित पडलेल्या भारतीयांना जागे करण्यासाठी  असे वध उपयुक्त  होते.निशस्त्र १००० निषेध सभेपेक्षा ब्रिटिशांच्या  कानटळ्या बसण्यासाठी  अशा क्रांतिकार्याची गरज होती. 

--- प्रशांत  कुलकर्णी  मनमाड

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...