विनोद जाधव एक संग्राहक

Sunday 31 October 2021

चक्रवर्ती सिंघणदेव महाराज

 

चक्रवर्ती सिंघणदेव महाराज ; 

हे भारतातील दक्खन प्रदेशातील यादव वंशातील सर्वात शक्तिशाली शासक होते. महाराज सिंघणदेव यांचा जन्म ११८६ मध्ये सिन्नर येथे झाला. त्यांच्या मातोश्रींचे नाव भगीरथीबाई होते, त्यांच्या वडिलांचे नाव जैतूगीदेव होते. दरम्यान त्यांचे आजोबासाहेब भिल्लमदेव हे चालुक्यांचे सामंत होते. नंतर महाराज भिल्लमदेव यांनी ११८७ मध्ये स्वतःला स्वतंत्र घोषित करुन सेऊन साम्राज्याची स्थापना केली, त्यांनी ११८७ मध्ये देवगिरि येथे किल्ला बांधला आणि देवगिरिला आपली राजधानी बनवली, ११८८ मध्ये त्यांनी गझनीचा सुलतान घियथ अल-दीन मुहम्मदचा सेनापती महम्मद गोरी याला महाराष्ट्राच्या सीमेवरुन पिटाळून लावले होते. त्यांनी ११८७ - ११९१ पर्यंत महाराष्ट्रवर राज्य केले होते, ११८९ मध्ये त्यांनी सूरातूर येथे झालेल्या लढाईत होयसळ शासक बल्लालाचा पराभव केला होता, ११९१ मध्ये ते युद्धात बल्लाल सोबत लढता लढता विरगतित मरण पावले होते. त्यांच्या नंतर त्यांचे पुत्र महाराज जैतूगीदेव हे राजे झाले, त्यांनी ११९१-१२०० पर्यंत राज्य केले होते. तिथे दुसरी कडे उत्तर भारतात मोहम्मद गोरीने घियथ अल-दीन मुहम्मद याच्या साठी ११९२ मध्ये निर्णायकपणे अजमेरचे सम्राट पृथ्वीराज चौहान यांचा पराभव केला, मंग यानंतर त्याने कनैजचा राजा जयचंद याचा पराभव केला, असे करुन घुरीड वंशाचे वर्चस्व भारतात प्रस्थापित झाले, यानंतर ११९४ मध्ये गझनीचा सुलतान घियथ अल-दीन मुहम्मद याने मोहम्मद गोरीला महाराष्ट्राच्या स्वारीवर पाठवले, मोहम्मद गोरी याने माळवा आणि गुजरात हे दोन राज्य काबीज करत महाराष्ट्रावर आक्रमकण केले, तेव्हा महाराज जैतूगीदेव यांनी त्याला महाराष्ट्राच्या सीमेवरुन पिटाळून लावले.
यानंतर मोहम्मद गोरीने तीन वेळा महाराष्ट्रावर स्वारी केली, ११९५ मध्ये, ११९६ मध्ये आणि ११९७ मध्ये, त्याने जेव्हड्या वेळा महाराष्ट्रावर स्वारी केली तेव्हढ्याच वेळा महाराज जैतूगीदेव यांनी त्याला पिटाळून लावले होते. महाराज जैतूगीदेव वारंगळचा राजा महादेव याच्या सोबत युद्ध करण्यासाठी वारंगळला गेले, त्यांच्या सोबत युवराज सिंघणदेव सुध्दा गेले होते, तेव्हा ते १२ वर्षाचे होते, महाराज जैतूगीदेव यांनी वारंगळ येथे महादेव सोबत युद्ध केले, युद्धा मध्ये महाराज जैतूगीदेव सोबत युवराज सिंघणदेव शत्रूंशी धैर्याने लढत होते, या युद्धात महाराज जैतूगीदेव विजयी झाले, आंध्र हे राज्य आता सेऊन साम्राज्याच्या अधिपत्याखाली आले, वयाच्या १३व्या वर्षी चक्रवर्ती सिंघणदेव महाराज यांचा विवाह पुर्व खानदेशाचे सुभेदार सोमनाथराव यांची कंन्या जेहाबाई यांच्या सोबत झाला, यानंतर ३१ ऑगस्ट १२०० मध्ये वयाच्या पस्तीसाव्या वर्षी महाराज जैतूगीदेव यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर महाराज सिंघणदेव वयाच्या १५व्या वर्षी सेऊन साम्राज्याचे चक्रवर्ती झाले, १२०१ मध्ये घुरीड शासक घियथ अल-दीन मुहम्मद याने पुन्हा मोहम्मद गोरी याला महाराष्ट्राच्या स्वारीवर पाठवले, महम्मद गोरी याने पुन्हा महाराष्ट्रावर आक्रमकण केले, मोहम्मद गोरीला वाटले की या १५ वर्षाच्या मुलाला युद्धात पराभूत करुन महाराष्ट्र काबीज करणं सोपं आहे, मोहम्मद गोरीला काय माहित होते की चक्रवर्ती सिंघणदेव महाराज हे लहानपणापासूनच शूर आहेत.
मोहम्मद गोरीने विंध्य ओलांडून नर्मदा नदी पार करून महाराष्ट्रातात प्रवेश केले, मोहम्मद गोरीने महाराष्ट्रात प्रवेश केले आहे ही बातमी महाराजांना लवकरच मिळाली, लवकरच ते मोहम्मद गोरी सोबत युद्ध करण्यासाठी निघाले, मोहम्मद गोरी हा विदर्भात होता त्याच्याकडे ७०,००० घोडदळ, २०,००० पायदळ येवढे सैन्य होते, आणि महाराजांकडे ३५,००० घोडदळ, ३४,००० येवढे सैन्य होते, येवढे सैन्य घेऊन ते विदर्भात आले, चक्रवर्ती सिंघणदेव महाराज आणि मोहम्मद गोरी यांच्या मध्ये खूप मोठे युद्ध झाले होते, या युद्धात चक्रवर्ती सिंघणदेव महाराज विजयी झाले आणि मोहम्मद गोरी पराभूत झाला, मोहम्मद गोरी पराभूत हून गझनी परतला, १२०२ मध्ये घियथ अल-दीन मुहम्मद याच्या मृत्यू नंतर मोहम्मद गोरी गझनीचा सुलतान झाला, यानंतर त्याने ५ वेळा महाराष्ट्रावर स्वारी केली, तेव्हढ्याच वेळा महाराजांनी त्याला पिटाळून लावले, १२०६ मध्ये मोहम्मद गोरी याचा मृत्यू झाला.
१२०६ मध्ये महाराजांनी सध्याचे विजयपूर जिंकले होते, महाराजांनी सरदार केशवराव यांना विजयपुरची जहागिरी दिली, सैंदत्तीच्या रट्ट्यांनी, ज्यांनी पूर्वी होयसल अधिराज्य स्वीकारले होते, त्यांनी चक्रवर्ती सिंघणदेव महाराजांशी निष्ठा बदलली आणि यादव शक्तीचा दक्षिणेकडे विस्तार करण्यास मदत केली. १२१५ मध्ये महाराजांनी उत्तरेत माळवावर आक्रमकण करून माळवा काबीज केले आणि दक्षिणेकडे सुभेदार महादेवरावांनी बनवासीवर कब्जा केला, आणि महाराजांनी सुभेदार महादेवराव यांना कराड संस्थानाची जहागिरी दिली.
१२१६ मध्ये महाराजांनी कोल्हापूरचे राजे भोजदेव यांचा पराभव केला होता, राजधानी कोल्हापूरसह शिलाहारांचे राज्य सेऊन साम्राज्यात विलीन झाले होते, चक्रवर्ती सिंघणदेव महाराजांनी राजे भोजदेव यांची कन्या कवलाबाई यांच्या सोबत विवाह केला होता. १२१९ मध्ये महाराजांनी राजपूताना आणि सिंध हे दोन राज्य काबीज केले होते,
१२२० मध्ये चक्रवर्ती सिंघणदेव महाराजांनी गुजरातकडे एक मजबूत सैन्य पाठवले. या सैन्याचे नेतृत्व सरदार सोमेश्वररावांनी केले होते, सरदार सोमेश्वररावांनी पाटण येथे राजा भीमदेव सोबत युद्ध केले, या युद्धात भीमदेव पराभूत झाला, आणि दक्षिणकडे महाराजांनी तुंगभद्र नदीच्या उत्तरेकडील क्षेत्रावर विजय मिळवला होता, यानंतर महाराजांनी गोंडवाना राज्यावर आक्रमकण करून या राज्यावर विजय मिळवला होता,
जेव्हा १२३५ मध्ये दिल्लीचा सुलतान इल्तुत्मिशने भिल्सा राज्य काबीज केरून महाराष्ट्रावर आक्रमकण केले तेव्हा महाराजांनी त्याला ग्वालियर पर्यंत पिटाळून लावले होते आणि ग्वालियर, काशी, मथुरा आणि पटना हे शहर काबीज केले होते, यानंतर महाराजांनी म्हैसूर, त्रवंकोर आणि तमिळमाड हे राज्य काबीज केले होते, चक्रवर्ती सिंघणदेव महाराज यांच्या काळात महाराष्ट्र राज्याची भरभराट झाली होती, त्यांच्या काळात महाराष्ट्रातील प्रजा सुखी होती, तेव्हाच्या काळात महाराष्ट्रचे लोकं चक्रवर्ती सिंघणदेव महाराजांना दैवत मानयचे. २३ डिसेंबर १२४६ मध्ये वयाच्या ६१ व्या वर्षी चक्रवर्ती सिंघणदेव महाराजांचे निधन झाले होते.
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजाबाई ह्या चक्रवर्ती सिंघणदेव महाराज यांच्याच वंशज होत्या.
✍ शंतनु जाधव (लेख अधिकृत)

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...