विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 6 November 2021

#मराठा_साम्राज्यात_पवारांची #विशेषता_धारच्या_पवारांची_कामगिरी भाग ५

 


#मराठा_साम्राज्यात_पवारांची
भाग ५
बुबाजी,रायाजी व केरोजी या तीन बंधूंची वेगवेगळी तीन घराणी विद्यमान आहेत. त्यात बुबाजी घराण्याचा विस्तार फार मोठा असून त्यापासून च धार व देवासची संस्थाने उगम पावली आहेत.रायाजींचे घराणे वाघाळें जिल्हा नगर (हल्ली पुणे) येथे असून केरोजींचे खानदेशात नगरदेवळे येथे आहे.ही घराणी वाघाळकर व नगरदेवळेकर या नावाने प्रसिद्ध आहेत.
बुबाजी महाराजांना दोन पुत्र होते वडील काळोजी व धाकटे संभाजी .संभाजी यांनी जिंजीच्या वेढ्यात पराक्रम केल्यामुळे त्यास रामचंद्रपंत बावडेकर अमात्यान योग्यतेस चढविले (म.रा. मध्य वि.3 पृष्ठ 285 )
इसवी सन 1694 पासून 1700 पर्यंत किंवा यानंतर काही वर्षे पुढेही मराठी सरदारांनी माळव्यावर ज्या स्वाऱ्या केल्या त्यात बुबाजींचे बंधू रायाजी व केरोजी व त्यांचे पुत्र काळोजी व संभाजी पवार सरदार प्रामुख्यत्वाने असावेत असा तर्क आहे. यापैकी कोण कोण कोण कोणत्या सालांच्या स्वारीत होते याबद्दल अद्याप स्पष्ट आधार मिळाला नाही ;तथापि इ.स.1696 मध्ये या पवार सरदारांनी मांडवगड वर हल्ला चढविल्याचा उल्लेख देवास गॅझिटियर पृ. 3 मध्ये आला आहे . काळोजी माळव्यातील स्वारीवर आले होत याबद्दल संस्थान देवास पैकी अलोठ येथील ठाकूर जवानसींग यांच्या कडून देवास गॅझेटियर करिता जी माहिती देण्यात आली होती, त्यात उल्लेख आला असून ह्या प्रांतातील तत्कालीन परिस्थिती दर्शवणारा एका पोवाड्यातही "कालू मराठा दक्खन वाला" असा काळोजी विषयी स्पष्ट उल्लेख आहे.रतन सिंह चौधरी कडील कागदातही काळोजी माळव्यात आल्या बद्दल चा दाखला आहे.
काळोजीचे पुत्र तुकोजी व जिवाजी यांना पुढे इसवीसन 1732 मध्ये माळव्याची वाटणी होऊन देवास वगैरे परभणी मिळाले,तेव्हा पासून ते देवासकर पवार म्हणविले जाऊ लागले.
संग्रहण -
*महेश पवार व अनिल पवार*
इतिहास माहिती प्रसारक व
सोशल मिडिया प्रमुख ,
*राजे धार पवार युवा संघटना*
*अध्यक्ष सुर्यजीत पवार*, महाराष्ट्र राज्य🙏
(अनमोल सहकार्य :- गडप्रेमी श्री.बाळासाहेब पवार)

No comments:

Post a Comment

राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला 🚩 भाग 9

  राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला भाग 9 लखुजीराजे जाधवरावांची हत्या भातवडीच्या युद्धानंतर मलिक ...