भाग ४
कृष्णाजी पवारांच्या ह्यातींतच त्यांचे पुत्र छत्रपतींच्या लष्कराचा चाकरीस राहून कामगिर्या बजावत होते.कृष्णाजी व त्यांची तीन मुले बुबाजी,रायाची व केरोजी या पिता-पुत्रांची त्यावेळी छत्रपतींच्या दरबारातील नामांकित सदरात गणना होती.(शिवाजी महाराजांची बखर,विविध ज्ञानविस्तार ऑगस्ट व सप्टेंबर सण 1881 इसवीसनपूर्व 199) छत्रपती शिवाजी महाराजांच्या खास हुजूर पागेंतील सरदारांच्या यादीतही यांची नावे आहेत.(केळुस्कर शिवाजी चरित्र पृ. 554 व 555 ) या पवार सरदारांच्या कामगिर्यां बद्दल जस्टीस रानडे म्हणतात की "यापैकी एकाने ही शिवाजी महाराजांशी नमक हरामी केली नाही) (रानडे उत्कर्ष पृष्ठ 37) पवारांकडे सुप्याप्रमाणे वाघाळें येथील मोकद्दमी पूर्वीपासून होती व कृष्णाजींनी इसवीसन 1799 मध्ये आणखी मलठण येथील निम्मे मोकद्दमी ही खरेदी केली.( मलठण दप्तर,महजर अप्रकाशित) यावरून त्या काळी मराठा मंडळीत निरनिराळ्या ठिकाणी पाटीलकीची वतने करून ठेवण्याचे अशी प्रवृत्ती होती हे लक्षात येते.
यावेळी कृष्णाची पवारांचे तीन पुत्र बुबाजी,रायाजी व केरोजी हे अधिक वैभवाला चढले होते.
छत्रपती राजाराम महाराजांच्या वेळी त्रिवर्ग बंधूंनी मराठी साम्राज्याचा विस्तार करण्याच्या कामास सुरुवात केली. "त्यांनी मातब्बर जमियत बाळगून मुलखातील बंडे मोडली व बंदोबस्त केला,अाणि तापी तीरा पर्यंत स्वराज्याचा अंमल बसविला ." अशी मोठमोठी विश्वासाची कामे यांनी बजावली म्हणून छत्रपती राजाराम महाराजांनी बुबाजी यांना "विश्वासराव" हे सन्मानाचे पद व सरंजाम दिला व केरोजी यांना "सेनाबारासहस्री" ही बहुमानाची पदवी दिली.(मुलांचा महाराष्ट्र पृ. 110 आवृत्ती दुसरी व मावजी कै.पृ.69-79) केरोजी पवार यांच्या शीक्यांत " श्री राजाराम चरणी दृढ भाव" असे शब्द आहेत , यावरून ते छत्रपती राजाराम महाराजांच्या पदरी वैभवास वाढले ही गोष्ट स्पष्ट होते. त्या काळच्या प्रमुख सरदारांत केरोजी पवार यांची गणना होत असून त्यांच्याकडे चाकण चौर्यायंशी हा प्रांत वहिवाटीस होता. छत्रपती राजाराम महाराजांनी कडून मिळालेली 'विश्वासराव' ही पदवीही ते आपणास लावीत असत (राजवाडे खंड पंधरा ले. 443) यावरून 'विश्वासराव' हे पद सामाईक असावे असे अनुमान होते. छत्रपती शाहू महाराजांच्या वेळी ही केरोजी पवार फौज बाळगून कामगिर्या बजावत होते.संताजी पांढरे व चंद्रसेन जाधव यांचे युद्ध होऊन संताजी पांढरे पडले , तेव्हा शाहू महाराजांनी " गनीमास नतीजा पावावयासाठी मनसुबा करण्या करिता केरोजी पवार ,काळोजी भोसले व दावलजी सोमवंशी यास हुजुर येण्याविषयी आज्ञा केली होती.(शाहू म.रो.ले.9 तारीख 16 जुलै 1724)
संग्रहण -
*महेश पवार व अनिल पवार*
इतिहास माहिती प्रसारक व
सोशल मिडिया प्रमुख ,
*राजे धार पवार युवा संघटना*
*अध्यक्ष सुर्यजीत पवार*, महाराष्ट्र राज्य

(अनमोल सहकार्य :- गडप्रेमी श्री.बाळासाहेब पवार)
No comments:
Post a Comment