विनोद जाधव एक संग्राहक

Saturday 1 January 2022

सेनासप्तसहस्री श्रीमंत दुसरे कृष्णाजी राव उर्फ बाबासाहेब पवार महाराज देवास थोरली पाती चे पाचवे राजे

 सेनासप्तसहस्री श्रीमंत दुसरे कृष्णाजी राव उर्फ बाबासाहेब पवार महाराज देवास थोरली पाती चे पाचवे राजे


🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
देवासचे चौथे राजे रुक्मांगदराव उर्फ खासेसाहेब पवार यांना पुत्रसंतती न झाल्यामुळे त्यांनी सुपे येथील माधवराव पवार ( विश्वासराव ) यांचे कनिष्ठ पुत्र बुबाजीराव यांना दत्तक घेऊन त्यांचे नाव कृष्णाजीराव ठेवले.
कृष्णाजीरावांचा जन्म 30 ऑक्टोंबर 1849 रोजी सुपे येथे झाला होता. देवासच्या गादीवर ज्यावेळी कृष्णाजीराव विराजमान झाले , त्यावेळी त्यांचे वय दहा-अकरा वर्ष होते. त्यामुळे त्यांच्या आई यमुनाबाई साहेब यांनी सात वर्ष उत्तम प्रकारे देवासचा कारभार चालवला. पुढे दिनांक 23 मार्च 1867 रोजी कृष्णरावांना संपूर्ण राज्यअधिकार प्राप्त झाले. त्याच वर्षी दि.26 जून पासून 15 तोफांच्या सलामीचा मान या राजघराण्याचा इंग्रज सरकारकडून दिला गेला.
कृष्णाजीराव हे अश्वारोहण , दानपट्टा , निशाणेबाजी वगैरे शास्रकलेत फार प्रवीण होते. त्यांना शिकार करण्याची भारी हौस होती. त्यांनी अनेक मोठ्या हिंस्र श्वापदांची शिकार केली . ते निस्सीम शिवउपासक होते . दान धर्माकडे त्यांचा विशेष कल असल्याने त्यांचा स्वभाव फार खर्चिक बनला होता . प्रजेवर त्यांचे खूप प्रेम होते , प्रजेच्या सोयीसाठी ते नेहमी काळजी वाहत. देवास मध्ये पूर्वी पाण्याचे फार दुर्भिक्ष होते व घाण पाणी पिण्यास येत असे , त्यामुळे नेहमी रोगराई चालू असे. प्रजेचे दुःख निवारण्यासाठी कृष्णाजीरावांनी स्वतःच्या हातखर्चातून "राणीबागे" मध्ये भव्य विहीर बांधली व तेथून नहरा( नळा)द्वारे गावात पाण्याचा पुरवठा केला व त्यास "श्रीकृष्णनहर" ( श्रीकृष्ण वॉटर वर्कस ) असे नाव दिले. या नहराचा उद्घाटन समारंभ दिनांक 1 फेब्रुवारी 1898 रोजी हिंदुस्थानचे तत्कालीन ए.जी.जी.कर्नल डी.डब्लु.बार यांच्या हस्ते करवीला होता. कृष्णाजीरावांनी त्यांच्या कारकिर्दीत "कृष्णपुरा पेठ" देवास मध्ये वसवली. देवासमध्ये राणीबाग , विश्रामबाग , नवाबाग वगैरे बागा त्यांनीच तयार करून घेतल्या होत्या, तसेच सागर महल , गव्हर्नमेंट हाऊस , दवाखाना , राणी बागेतील कोठी वगैरे इमारतीत त्यांनीच बांधलेल्या आहेत.
*प्रजेची मुलांप्रमाणे काळजी घेणाऱ्या सेनासप्तसहस्री श्रीमंत कृष्णाजीराव महाराजांना आज त्यांच्या जयंति निमित्त विनम्र अभिवादन !*
🚩🚩🚩
लेखन
महेश पवार
मो.नं.7350288953

No comments:

Post a Comment

सह्याद्रीची काळ्या कातळाची तटबंदी असलेला - दातेगड

  सह्याद्रीची काळ्या कातळाची तटबंदी असलेला - दातेगड ---- ramkumarshedge राजधानी सातारा येथील पाटणजवळील दातेगड हा किल्ला प्रेक्षणीय अ...