विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday 30 August 2023

दिल्लीवर_ताबा_दरबाराची_नासधूस

 

मराठ्यांनी दिल्लीचा कब्जा मिळवला व बादशाही गादीवर वारस नेमून रोहल्यांचा पुढारी अहमदशहा अब्दालीच्या मागे लागले त्यावेळी सदाशिवराव भाऊ पेशव्यांनी शिंदे, होळकर सरदारांचा विरोध असताना ही दिल्ली दरबारातील सोन्याचा व चांदीचा पत्रा काढून त्याची नाणी पाडली त्यामुळे जाट, शिख, रजपूत व इतर स्थानिक जहागीरदारांचा मराठ्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला त्यांनी पुढील काळात मराठ्यांना कोणतेही सहकार्य न करता फक्त बघ्याची भूमिका घेतली
सदाशिवराव भाऊ पेशव्यांना शिंदे, होळकर सरदारांचा उत्तरेकडच्या राजकारणात असलेला सहभाग व दरारा अजिबात पचला नव्हता त्यामुळे सदाशिवराव भाऊने शिंदे होळकरांचा कोणताही सल्ला न ऐकण्याचा जणू धडाकाच लावला होता मल्हारराव होळकर व जनकोजी शिंदे यांनी सदाशिवराव भाऊ पेशव्यांना सगळा कुटुंब कबिला माळव्यात एखाद्या सुरक्षित ठिकाणी ठेवावा असा सल्ला दिला पण बळवंतराव मेहेंदळे याने भाऊंचे अगोदरच कान भरले होते मल्हारराव होळकरांचा हस्तक असलेल्या सुरजमल जाट यांना लुटून होळकरांचा उत्तरेकडचा दबदबा कमी करण्याचा कुटील डाव सदाशिवराव भाऊने आखला मल्हारराव होळकरांना समजताच त्यांनी सुरजमल जाटला निघून जाण्यास सांगितले त्याप्रमाणे पानिपतच्या लढाईच्या काही महिने अगोदर आपल्या १५ हजार फौजेसह सुरजमल जाट निघून गेला
यानंतर मराठ्यांनी कुंजपुऱ्याचा किल्ला ताब्यात घेतला यावेळी मल्हारराव होळकर, जनकोजी शिंदे, महादजी शिंदे, दमाजी गायकवाड, समशेरबहाद्दर, इब्राहीमखान गार्दी, बळवंतराव मेहेंदळे, खिजरखान पठाण, पेशवा विश्वासराव यांनी मोठा पराक्रम गाजवला यात १५ हजार पठाणांचा धुव्वा उडला दत्ताजी शिंदेची हत्या करणारे नजिबखान व कुतुबशहा कैद झाले जनकोजी शिंदे यांनी कुतुबशहाचा वध केला आणि आपली प्रतिज्ञा पूर्ण केली
संदर्भ_ पानिपतचा मुकाबला

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...