लेखन ::
अपशी!
हे अपशी म्हणजे आपल्या भाषेत हबशी. हे हबशी म्हणजे जंजिऱ्याचे सिद्दी. हे सिद्दी मूळचे अँँबीसीनिया(इथियोपिया) मधील रहिवाशी. बहमनी साम्राज्याच्या काळात यांना भारतात गुलाम म्हणून आणले गेले. पुढे स्वकर्तुत्वाने या हबश्यांनी नावं कमावली.
१५०० ते १९४७ या जवळजवळ ४५० वर्षांच्या काळात या हबशींनी(सिद्दी) जंजिरा स्थानावर राज्य केलं.
आज आपण जंजिरा म्हणजे फक्त मुरुज जंजिऱ्याचा किल्ला एवढंच समजतो. पण मुळात जंजिरा संस्थान एकेकाळी फार मोठं होतं. अगदी रायगड पर्यंत.
जंजिरा संस्थानाने या ४५० वर्षांच्या काळात वेगवेगळ्या वेळी एकूण २२ किल्ल्यांवर राज्य केलं. हे किल्ले पुढील प्रमाणे,
- जंजिरा
- दंडा राजपुरी
- पद्मदुर्ग
- अंजनवेल
- गोवळकोट
- उंदेरी
- अवचितगड
- बिरवाडी
- विजयगड
- रायगड
- पाचाड
- बाणकोट
- तळा
- घोसाळा
- सुरगड
- दाभोळ
- कनकदुर्ग
- फतेहदुर्ग
- पालगड
- रत्नदुर्ग
- थाल
- माडगड
या नकाशावरून आपल्याला आधारण अंदाज येऊ शकतो की जंजिरा संस्थान एकेकाळी किती पसरलं होतं.
- इ.स. १४८२-८४
मलिक अहमद हा बहमनी साम्राज्याच्या जुन्नर प्रांताचा अधिकारी होता. जंजिऱ्यावर कोळी लोकांची सत्ता होती. जंजिऱ्याचं दंडा-राजपुरी हे मोठं बंदर होतं. या बंदरावर ताबा मिळविण्यासाठी या मलिक अहमदने जंजिरा किल्ल्यावर हल्ला केला. पराभूत झाला.
पुढे सिद्दी पेरीम खान ने जंजिऱ्यावर हल्ला केला जो यशस्वी झाला. या पेरीम खानच्या आक्रमणादरम्यान जंजिऱ्याच्या बेटावर लाकडी किल्ला असल्याचे उल्लेख मिळतात.
यानंतर बुऱ्हाण खान नावाच्या सरदाराला किल्ल्यावर ठेवण्यात आले त्याने थोडी बांधकामं केली. पुढे पहिम खान किल्लेदार बनला. याने बरीच बांधकामं करून किल्ला मजबूत केला.
- इ.स. १६१८ = सिद्दी मुघलांना सामील झाला.
- इ.स. १६१९ = सिद्दी निजामशाहिला सामील झाला.
- इ.स. १६३६ = सिद्दी आदिलशाहीला सामील झाला.
- १६९०-१७३३
हा काळ या संस्थानासाठी सुवर्णकाळ मानला जातो. कारण संभाजी महाराजांच्या खुनानंतर १६९० साली सिद्दींनी वरील बरेचसे किल्ले जिंकून घेतले होते. १७३३ पर्यंत बाजीराव पेशवे आणि कान्होजी आंग्र्यांनी जेव्हा सिद्दी विरुद्ध आघाडी उघडली तत्पूर्वी म्हणजेच साधारण ही ४५ वर्ष नकाशात दाखवलेला हा बराच मोठा प्रदेश सिद्दी च्या ताब्यात होता.
- इ.स. १७४५
या साली तुळाजी आंग्रे यांनी सिद्दीचे फतेहदुर्ग, कनकदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि गोवा फोर्ट हे किल्ले एकाच वर्षात जिंकून घेतले.
यावेळी सिद्दी कडे फक्त जंजिरा आणि पद्मदुर्ग हे २ किल्ले राहिले होते.
- इ.स. १७६१
पद्मदुर्ग किल्ला ब्रिटिशांनी जिंकून घेतला. आता सिद्दी कडे फक्त जंजिरा किल्ला राहिला होता.
- इ.स. १९४७
सिद्दी संस्थान भारतात सामील झाले.
जंजिरा मोहीम - इ.स. १७३३
इकडे
उत्तरात मी सिद्दीच्या गडांपैकी महत्वाच्या गडांवर झालेली युद्ध सांगणार
आहे. त्या आधी मी वर उल्लेख केल्याप्रमाणे बाजीराव पेशवे आणि आंग्र्यांनी
मिळून जी सिद्दी विरुद्ध मोहीम उघडली होती त्याची पार्श्वभूमी सांगणार
आहे.
त्या काळी ब्रह्मेन्द्रस्वामी नावाचे मोठे पंडित होते. पेशवे, छत्रपती, आंग्रे वगैरे सगळी मंडळी त्यांना खूप मानायची. अगदी जंजिऱ्याचा सिद्दी सुद्धा त्यांना मानायचा!! त्याने तर या ब्रह्मेन्द्र स्वामींनी केलेले चमत्कारही लिहून ठेवलेत. या ब्रह्मेन्द्र स्वामींमुळे पेशव्यांनी अजूनपर्यंत सिद्दी विरुद्ध आघाडी उघडली नव्हती.
एका वेळी झालं असं की सिद्दीला निजामाने एक हत्ती
भेट म्हणून दिला होता. परंतु तो हत्ती घेण्यासाठी सिद्दीला त्याच्याकडे
जावं लागणार होतं. परंतु मधे आंग्रे, पेशवे यांचे भाग असल्यामुळे सिद्दीने
स्वतः न जाता ब्रह्मेन्द्र स्वामींना हत्ती आणण्यासाठी पाठवलं.
ब्रह्मेन्द्र
स्वामी गेले, हत्ती घेतला. परत येताना पेशव्यांच्या सीमेवर कोणीही
त्यांना अडवलं नाही. परंतु आंग्र्यांच्या सीमेवर अडवलं. पुढे त्यांना
सोडलं सुद्धा, पण इकडे सिद्दीला हा गैरसमज झाला की ब्रह्मेन्द्र स्वामींनी
त्याला धोका दिला आणि मुद्दामुन स्वतःला हत्तीसकट अडकवून घेतलं. या
गैरसमजात त्याने ब्रह्मेन्द्र स्वामींचा आश्रम जाळून टाकला.
या प्रकरणामुळे ब्रह्मेन्द्र स्वामींनी मध्ये न पडता पेशवे आणि आंग्र्यांना सिद्दी विरुद्ध हमखास आघाडी उघडण्यास सांगितले.
पेशव्यांच्या तर्फे खुद्द बाजीराव नेतृत्व करत होते आणि आंग्र्यांच्या तर्फे संभाजी आंग्रे नेतृत्व करत होते.
या सिद्दी विरुद्धच्या मोहिमेत सिद्दीने संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर
जिंकलेले किल्ले मराठ्यांनी घेतलेच परंतु सिद्दीचेही बरेच किल्ले जिंकून
घेतले आणि सिद्दी कडे जंजिरा, पद्मदुर्ग, दंडा राजपुरी, गोवळकोट आणि
गोपाळगड हे फक्त ५ किल्ले शिल्लक राहिले.
आता जंजिरा संस्थानातील काही महत्वाच्या किल्ल्यांबद्दल सांगतो,
- जंजिरा
जंजिरा किल्ल्याचा इतिहास वर सांगीतला. जंजिरा हा किल्ला भारतात सर्वात प्रचंड सागरी किल्ला आहे.
जंजिरा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. परंतु कोणीही यशस्वी झालं नाही.
- शिवाजी महाराजांनी २नदा प्रयत्न केले. त्यांनी बाजूला पद्मदुर्ग बांधला ज्याचे बांधकाम १६८४ ला संपले.
- संभाजी महाराजांनी प्रयत्न केले होते.
- १७३३ च्या जंजिरा मोहिमेदरम्यान बाजीरावांनी अगदी दंडा राजपुरी सुद्धा घेतलं होतं. परंतु सिद्दी ने तह केला म्हणून जंजिरा मिळाला नाही.
- नाना फडणवीसांनी सुद्धा सिद्दीशी बोलणी केली होती. जंजिरा प्रांत मराठ्यांना देऊन सिद्दी साठी गुजरात मधील 'सचिन' प्रांत देण्याचे ठरले होते. सिद्दी तयार होता, अगदी सही शिक्के सुद्धा झाले होते. पण ब्रिटिशांना ही गोष्ट कळली आणि त्यांनी सिद्दीचे मन वळवले.
पुढे भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत जंजिरा अजिंक्य राहिला.
2. उंदेरी / जयदुर्ग
हा
किल्ला सिद्दी कासीमने १६८० साली बांधायला घेतला. मराठ्यांनी वेळोवेळी
हल्ले केले परंतु मराठ्यांना काही यश आले नाही. पुढे शिवाजी महाराजांनंतर
संभाजी महाराजांनी सुद्धा हा किल्ला घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु यश
आले नाही. पुढे ८० वर्षांनी म्हणजे २० जानेवारी इ.स. १७६० रोजी मराठ्यांनी
हा किल्ला जिंकून घेतला.
3. अंजनवेल
हा
किल्ला १६७० रोजी शिवाजी महाराजांनी आदिलशाही कडून जिंकला होता. १६९९ साली
सिद्दी ने जिंकला. १७३३ साली जंजिरा मोहिमेदरम्यान मराठ्यांनी किल्ला
जिंकून घेतला. लवकरच सिद्दी ने किल्ला परत जिंकून घेतला होता. १७४५ रोजी
आंग्रे यांनी किल्ला जिंकून घेतला.
4. रायगड आणि पाचाड
संभाजी
महाराजांच्या मृत्यूनंतर १६८९ रोजी हे दोन्ही किल्ले मुघलांनी जिंकून
घेतले. १७०७ साली औरंगजेबाच्या मृत्यूनंतर हे किल्ले मुघलांनी सिद्दी ला
दिले. १७३३ पर्यंत दोन्ही किल्ले सिद्दी कडे होते. जंजिरा मोहिमेदरम्यान हे
दोन्ही किल्ले मराठ्यांनी जिंकून घेतले.
5. बाणकोट
१५४८
पर्यंत किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. १५४८ साली निजामशाही कडे
गेला. १६४८ साली शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला. १६८९ साली सिद्दीने
जिंकला. १७ मार्च १७३३ साली जंजिरे मोहिमेदरम्यान संभाजी आंग्र्यांनी
किल्ला जिंकला. एप्रिल मध्ये लगेच सिद्दी ने परत घेतला. मे मध्ये लगेच
संभाजी आंग्र्यांनी पुन्हा जिंकून घेतला.
धन्यवाद ।
No comments:
Post a Comment