विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday 30 August 2023

मराठेशाहीचा कळस ! अटकेपार भगवा झेंडा !! – उत्तरार्ध भाग ९

 











मराठेशाहीचा कळस ! अटकेपार भगवा झेंडा !! – उत्तरार्ध
भाग ९
गुरुवर्य निनाद बेडेकरांच्या भाषणात कुसुमाग्रजांचे हे काव्य त्यांनी काही प्रमाणात बदल करून सादर केले होते. ते इथे प्रस्तुत करून आपली रजा घेतो.
यमुनेचे तट पेटुनि उठले मंदिर आमचे कोसळते
रक्त आपुल्या प्रिय आईचे रणांगणावर ओघळते
असुराचे पद भ्रष्ट लागुनी आज सतीचे पुण्य मळे
अशा घडीला कोण करंटा तटस्थतेने दूर पळे ?
कृतांत ज्वाला त्वेषाची ना कोणाच्या हृदयात जळे ?
साममंत्र तो सरे, रणाची नौबत आता धडधडते
रक्त आपुल्या प्रिय आईचे रणांगणावर ओघळते
सह्यगिरीतिल वनराजांनो, या कुहरातुनि आज पुढे
रक्त हवे जर स्वतंत्रतेला, रक्ताचे पडतील सडे
एक रणांगण राखावाया करा रणांगण लक्ष खडे
समरपुरीचे वारकरी हो, समरदेवता बोलविते
रक्त आपुल्या प्रिय आईचे रणांगणावर ओघळते
खडक काजळी घोटुनि तुमचे मनगट-बाहू घडलेले
कडेकपारीमधील वणवे उरात तुमच्या दडलेले
काबुल-कंदाहार पथावर डंके तुमचे झडलेले
शिवतेजाची दीपमाळ पाठीशी अपुल्या पाजळते
रक्त आपुल्या प्रिय आईचे रणांगणावर ओघळते
कोटि कोटि असतील शरीरे मनगट अमुचे एक असे
कोटि कोटि देहात आजला एक मनीषा जागतसे
हिरवे जहरी सर्प ठेचणे – अन्य मना व्यवधान नसे
एक प्रतिज्ञा, विजय मिळेतो राहिल रण हे धगधगते
रक्त आपुल्या प्रिय आईचे रणांगणावर ओघळते …
- इति -
प्रणव महाजन.
padmadurg@gmail.com
नोंद –
दुआब = अंतर्वेद = दोन नद्यांमधील भूप्रदेश.
संदर्भ
राजवाडे खंड १ (जुना) – वि.का.राजवाडे
पेशवा दफ्तर – रु.क्र.१,२,२१. – विविध अस्सल पत्रे.
मराठी रियासत खंड ६ (१९५३ आवृत्ती) – गो.स.सरदेसाई.
पानिपत – त्र्यं.शं. शेजवलकर.
सियार-उल-मुतक्खरीन – अनुवाद – जदुनाथ सरकार.
पानिपत व्याख्यानमाला – निनाद बेडेकर.
अटक नकाशे – श्री. समीर माने, श्री. उमेश जोशी.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...